चिपळूण प्रतिनिधी : डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय येथील जय किसान ग्रुपच्या कृषीदुतांनी रामपूर येथे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून CRA (क्लायमेट रिसायलेंट एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी) या फळपीक लागवड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक शेतकरी पांडुरंग कातकर यांच्या शेतात दाखवले.
यावेळी कृषिदूतांनी व कृषी अधिकाऱ्यांनी CRA तंत्रज्ञानाचे महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना पटवून देत असताना सांगितले की CRA (हवामान प्रतिरोधक शेती )या तंत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन सुधारले जाते. यामध्ये विशिष्ट परिमाणासह खड्डे खोदणे, पाणी आणि पोषक तत्वांचे शोषण सुलभ करण्यासाठी वाळू आणि कंपोस्टने भरलेले PVC पाईप ठेवणे धोरणात्मक आहे.
यावेळी, उपकृषी अधिकारी श्री. डी. के. काळे,मंडळ कृषी अधिकारी श्री. दत्तात्रय आवारे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अमित मोटे व कृषिदूत तेजस चोथे,वैभव पवळ, प्रतीक माळी, ओंकार भापकर, उदयनराजे भोसले, तुषार भाबड,मंगेश पिसे, अमित माळी, पुरुषोत्तम माळी, विराज कणसे, भारतकुमार बिराजदार उपस्थित होते.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

