Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » डोळ्यात मिरचीची पुड फेकून, शस्त्रांचा धाक दाखवत १० लाख रुपये लुटले
महाराष्ट्र

डोळ्यात मिरचीची पुड फेकून, शस्त्रांचा धाक दाखवत १० लाख रुपये लुटले

याप्रकरणी व्ही.पी.रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaDecember 23, 2024No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : डोळ्यात मिरचीची पुड फेकून, शस्त्रांचा धाक दाखवून रोख १० लाख रुपये लुटल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. दोन संशयीत आरोपी तक्रारदार व त्याच्या सहकाऱ्याचा पाठलाग करीत होते, अशी माहिती सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीत निष्पन्न झाली. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

ही घटना गिरगाव येथील दुसरा पांजरापोळ, गुलालवाडी सर्कलमधील श्रीनाथ सहकारी सोसायटीमध्ये घडली. इंदरकुमार मोतीलाल प्रजापती भुलेश्‍वर परिसरात राहत असून तो एका खासगी कुरियर कंपनीत कामाला आहे. हरिश प्रजापती हे त्याचे मालक असून त्यांनी शुक्रवारी त्याला दहा लाख रुपये दिले होते. ही रोख घेऊन तो गिरगावमधील श्रीनाथ सोसायटीमध्ये आला होता. यावेळी त्याच्या मागून दोन तरुण तेथे आले. या दोघांनी शस्त्रांचा धाक दाखवून इंद्रकुमार आणि त्याचा सहकारी अनुरागसिंग उमेशसिंग राजपूत यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच इंद्रकुमार आणि अनुरागसिंग जवळील रोख दहा लाख रुपये त्यांनी घेऊन पलायन केले. यावेळी दोघांनी इंद्रकुमार आणि अनुरागसिंगच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. या प्रकारामुळे दोघेही प्रचंड घाबरले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती मालकांना दिली. मालकाच्या सूचनेनंतर त्यांनी घडलेला प्रकार व्ही. पी. रोड पोलिसांना सांगितला. याप्रकरणी इंदरकुमार प्रजापती याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रीकरण ताब्यात घेतले असून या चित्रीकरणाची पाहणी करून पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेण्यात येत आहे. आरोपी बराच काळ तक्रारदार व त्याचा सहकाऱ्याचा पाठलाग करीत होते. तसेच या गुन्ह्यांमागे ओळखीच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय़ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleचिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला परप्रांतीयांची मारहाण
Next Article आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याकडून महिला आयोगात तक्रार दाखल
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.