चिपळूण [ रूपाली भाटिया ] : जिजाऊ ब्रिगेड यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवला. जिजाऊ ब्रिगेडच्या उपशहर अध्यक्ष स्मिता खंडारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्री वाटप करण्यात आले. त्याचबरोबर भात लावण्याचा कार्यक्रमही राबवण्यात आला. तीवरे या गावी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी लावणीचा एक आनंद घेतला. ग्रामीण भागाशी आपली नाळ जोडलेली असते. आपण एका गावाला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या असलेल्या स्थानिक पातळीवरच्या काही महिलांच्या अडचणी लक्षात घेण्यासाठी तसेच आपण स्वतः सुद्धा त्यांच्यासोबत भात शेतीची लावणी लावण्याचा एक वेगळा आनंद महिलांना घेता यावा म्हणून तिवरे गावी जाऊन हा कार्यक्रम राबवण्यात आला लोकांनी सुद्धा त्यांचे उत्तम पद्धतीने स्वागत केले. गावच्या महिलांच्या काय अडचणी असू शकतात कुठल्या अडचणीला मात करून ग्रामीण भागातील महिला सक्षम कुटुंब बनते. याबाबत विचारांची देवाणघेवाण झाली आणि आपण ग्रामीण याबाबतचा एक वेगळा अनुभव या सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतला खूप छान वातावरण होते निसर्ग नटलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात हे तिवरे गाव आहे या निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा त्यांना आपलं आगळ्यावेगळ्या एक उपक्रम साजरा करता आला. गावकऱ्यांनी त्यांच्या गावात हा उपक्रम राबवला म्हणून जिजाऊ ब्रिगेडचे आभार मानले.
या कार्यक्रमाला उपस्थित माजी कोकण विभागीय उपाध्यक्ष व मार्गदर्शिका मालती ताई पवार कोकण मुंबई विभागीय कार्याध्यक्ष व मार्गदर्शिका निर्मलाताई जाधव. तालुकाध्यक्ष मीनल ताई गुरव . उपअध्यक्ष विना जावकर. अनामिका हरद्वारे खजिनदार अपूर्वा गायकवाड. रवीनाताई गुजर. खजिनदार नंदाताई भालेकर. माजी उपतालुकाध्यक्ष प्राजक्ताताई सरफरे . माजी खजिनदार माधवी भागवत . शहराध्यक्ष वर्षाताई खटके. उप शहराध्यक्ष स्मिता खंडारे शहरसचिव संध्या घाडगे पूजाताई सुर्वे .मनोरमा पाटील इत्यादी महिलांची उपस्थिती लाभली होती

