जितक्या माणसाच्या भावभावना त्याच्या आयुष्यावर परिणाम करतात त्याचबरोबर माणसाच्या सवयी ही त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करत असतात जसे कि आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक असते ती स्वयं प्रेरणा, बुद्धिमत्ता ,कष्ट करण्याची तयारी, सातत्य, दृष्टिकोन, आणि अनुशासन म्हणजेच शिस्त. शिस्त म्हणजे नेमकं काय कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यासाठी केले केले जाणारे नियोजन आणि ते नियोजन तंतोतंत पाळण.त्यामध्ये झोकून देऊन काटेकोर पणे पालन करणे आणि ते करत असताना जबाबदारीचे ही भान असणे आणि स्वतःवरच नियंत्रण हे सगळ्या गोष्टी अंगीकारल्या जाणे म्हणजेच शिस्त.
शिस्त म्हणजे नेमकं काय याचं विवेचन करत असताना अगदींच अनुशासन कोण शिकवते त्याची सुरूवात कुठून होते तर जेव्हा प्रत्येक ती, म्हणजे आई.आई मुलाला जन्म देते त्यांनतर सगळे चांगलें संस्कार देण्याचे काम आई वडील दोघेही आपापल्या परीने करत असतात .असे म्हटले जाते की मूल म्हणजे एक मातीचा गोळा असतो ज्याला आपण जसा आकार देऊ तसे तो घडत असते . प्रत्येक मुलाची आई त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते थोड्क्यात शिस्त हा आपल्या आयुष्यातला एक संस्कार आहे, असं म्हणायला हरकत नाही .कसे बसावे ,कसे उठावे ,कसे बोलावे ,या बरोबरीने स्वच्छता ,नीटनेटकेपणा या सगळ्याच गोष्टी आई मुलाला शिकवत असते. आणि प्रत्येक आईची इच्छा हीच असते की माझ्या मुलाला चांगली शिस्त असावी. हे झाले मुलाची जबाबदारी म्हणून आईने केलेल्या संस्काराचा एक भाग.
पण कसे आहे ना कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीनेच वाढवतात त्यांना चांगल्या , योग्य गोष्टी शिकवतात त्यांना शक्य असेल तितक्या चांगल्या गोष्टी देण्याचाही प्रयत्न करतात पण ते बालक ते मुल जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला स्वतःची बुद्धी वापरावी अशी जाणीव निर्माण होते त्या क्षणाला बऱ्याच गोष्टी बदलतात आणि तिथेच स्वतःवर नियंत्रण अनुशासन हे खूप महत्त्वाचे ठरते कारण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात जर स्थैर्य हवे असेल तर त्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे मग शिस्त म्हणजे सगळ्याच गोष्टी वेळेत करणं एक मिनिट इकडे तिकडे न होणार असे का नाही हे फार टोकाचे झाले पण ज्या गोष्टी ठरवल्या त्या गोष्टी त्या वेळेत करणे कुणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.कुठेही आपल्यामुळे कोणताही नियमाचा भंग होणार नाही हा एक शिस्तीचा भाग झाला.
कोणतेही यश हवे असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. शिस्त पाळण्यास वेळेचे महत्व लक्षात येतात शिस्त पाळल्यास कोणतीही उद्दिष्ट साध्य करता येतात. शिस्तीमुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे जमू लागते, स्वत्वाची जाणीव निर्माण होते. शिस्त असेल तर नियम पाळणा सोपे जाते म्हणूनच शिस्त हा एक महत्त्वाचा गुण आहे. तो अंगीकारण सोपे नाहीये. त्यासाठी हवे स्वतःवर नियंत्रण आले कोणती गोष्ट करावी कोणती गोष्ट टाळावी याचे आत्मभान हवे. सगळ्या गोष्टी वेळेवर करणं हा एक शिस्तीचा भाग आहे शिस्तीमुळे फारसे गोंधळ निर्माण नाही होत असे हे शिस्तीचे महत्व. असो
मला आवडलेले शिस्तीचे दुसरे नाव म्हणजे अनुशासन. अनुशासन=अनु+शासन नियमांच्या नुसार नियंत्रण किंवा कोणतेही आदेश पालन करणे. आता या अनुशासनामध्ये बाह्य अनुशासन आणि आंतरिक अनुशासन असे दोन भाग येतात. थोडक्यात बाह्य अनुशासन म्हणजे ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आणि आंतरिक अनुशासन म्हणजे स्वतः स्वतःसाठी ठरवलेल्या गोष्टी वेळेत प्रामाणिकपणे करणे.
प्रत्येक मूल्य समजून घेणे प्रत्येक नियमाचे पालन करणे जीवनामध्ये संतुलन निर्माण करणे वेळेचे नियोजन त्याचे तंतोतंत पालन आणि त्याचबरोबर कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवणं म्हणजे अनुशासन. काही स्पोर्ट्स प्लेयर यांचे कित्येक वर्ष मुलाखती ऐकणं वाचणं सुरू आहे माझे त्याचे कारण म्हणजे यांच्यासारखे अनुशासन पाळण हे खूप कठीण आहे असे माझे वैयक्तिक मत आहे .खेळ खेळणारा प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी शिस्त ही खरच वाखण्याजोगे आहे .आयुष्य कसं जगावं आणि कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी यशस्वी होण्यासाठी डिसिप्लिन असणे खूप अत्यावश्यक बाब आहे. कधीतरी इकडे तिकडे मन भर पडले तर एखाद्या आवडत्या स्पोर्ट्स प्लेयर ची मुलाखत जरूर पाहावी किंवा ऐकावी निश्चितपणे प्रेरणादायी असते, त्याने अनुशासन पुन्हा एकदा स्वतःमध्ये रुजवण्यास मदत होईल. अनुशासन होगा तभी जीवन सफल होगा.