Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
  • डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
  • कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
  • हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
  • उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
  • सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
  • छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
  •  डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !
Uncategorized

तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !

👉🏻 गुहागर तालुक्यामधुन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेत पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभ्राचा अग्रक्रमांक(९२%). 👉🏻 गुहागर तालुका ग्रामीण विभागातून शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांमध्ये शुभ्राचा प्रथम क्रमांक(७२%).
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJuly 16, 2025Updated:July 16, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा निलेश सुर्वे हिची राजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड जाहीर झाली. त्याचबरोबर गुहागर तालुक्यामधुन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेत पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा सुर्वे हिचा अग्रक्रमांक(९२%) आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांमध्येही गुहागर तालुका ग्रामीण विभागातून शुभ्रा सुर्वे हिने पुन्हा प्रथम क्रमांक(७२%) पटकावला आहे. कु.शुभ्रा ही उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील भाजपाचे नेतृत्व करणारे श्री.निलेश विश्वनाथ सुर्वे आणि काताळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांची थोरली कन्या आहे.
शुभ्राने इयत्ता पहिलीपासुनच आपल्या सर्वांगीण शैक्षणिक कौशल्याची चुणूक वारंवार दाखवली आहे. शालेय स्तर, केंद्र स्तर,बीट स्तरावर विविध स्पर्धांमध्ये तिने आपले कौशल्य दाखवून दिले आहे. वकृत्वामधे तीचे विशेष नैपुण्य आहे. शुभ्राच्या यशामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक श्री संदीप खंडगावकर, सहशिक्षक श्री रविंद्र राठोड यांचे मोलाचे योगदान तिला वारंवार लाभले आहे. शुभ्राच्या यशस्वीतेसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तवसाळ पंचक्रोशीचे खोत मोहनबंधु गडदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जगदीश गडदे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री विज्ञान सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सत्यवान गडदे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रसाद सुर्वे, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, राजेश सुर्वे,प्रदीप सुर्वे, श्याम गडदे, विजय शिवकर, उदय शिरधनकर,मनिषा मयेकर,प्रितम सुर्वे,कीरण गडदे,मोहिनी सुर्वे, मनस्वी सुर्वे, अभिसलाम वाडकर, हर्षदा गडदे, केंद्रप्रमुख चिपळूणकर सर यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करता अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.
“कल्पवृक्ष” या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या तवसाळच्या सुर्वे परिवारातील ‘शुभ्रा’ही नवोदय विद्यालयाच्या पात्रता परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होऊन प्रवेश घेणारी “५ वी” विद्यार्थिनी आहे. श्री.रोहन प्रमोद सुर्वे, सौ.ऋतुजा रोहन सुर्वे, कु.मृण्मयी जयंत सुर्वे, कु.सार्थक सचिन सुर्वे या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयामधून आपले शिक्षण पुर्ण करून यशस्वी उज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleलेख : ‘अनुशासन’
Next Article चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

January 26, 2026
Uncategorized

कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न

January 5, 2026
गुहागर

हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !

December 24, 2025
Top Posts

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025244 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025219 Views

कविता : वायरमन..!

January 13, 2025164 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.