मुंबई [उदय दणदणे] : कोकणची माती आणि श्रीमंती मनाची नाती यातच खरी कोकणची सौंदर्याता टिकून आहे, येथील निसर्गाने अवघ्या जगाला भुरळ घातली आहे,विशेषतःहोळी,गणेशोत्सव हे सण येथील सामाजिक एकतेचे दर्शन घडवतात,अशा विविधतेने नटलेल्या कोकणात गाव वाडी कुशीत विविध पारंपरिक लोककला आजही कायम जोपासल्या जातात,नमन,कलगीतुरा,भजन,भारुड, डफ शाहिरी ही लोककला वाडवडिलांनी जोपासली,ती पुढील पिढीकडे प्रवाहित होत तितकीच भावी पिढी जोपासताना दिसत आहे.
लोककलांचा प्रचार, प्रसार तसेच नवोदित शाहिराना मुंबई नगरीत व्यासपीठ उपलब्ध व्हावे व आपली कला सादर करता यावी यासाठी अनेक गाव /वाडी मंडळ, आयोजक, निर्माते प्रयत्न करीत आहेत.
त्यातीलच एक सामाजिक बांधीलकी जपणारे राजापूर तालुक्यातील पेंडखले हा बारा वाड्यांचा गाव :निनावेवाडी, मधली निनावेवाडी, वैतागवाडी,सातोपेवाडी-तेलीवाडी या चारही वाड्यांचे ग्रामस्थांनी एकत्रितपणे वाडवडीलानी आखून दिलेल्या सामाजिक संहितेच्या चौकटीत राहून सामाजिक कार्यात असो,शिमगोत्सव असो व अन्य मंगलकार्य असेल ते एकत्रितपणे पार पाडण्याची प्रथा आजतागायत अविरतपणे चालू आहे. त्याचाच वारसा पुढे नेत सामाजिक कार्यासाठी चारवाडी विकास मंडळ,मुंबई पेंडखले यांच्या वतीने रविवार दिनांक -२७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:३० वा.श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर- मुंबई येथे “कलगी तुरा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून
कलगीवाले शाहीर: विघ्नेश तांबे,(ब्रह्मनिष्ठ सदालाल घराणे) मु.चिखले,चिराडवाडी,राजापूर विरुद्ध तुरेवाले: स्वप्निल बाईंग (शंभूराजु घराणे) मु.तेरवण, बाईंगवाडी – राजापूर या दोन युवा शाहिरांत ही जुगलबंदी रंगणार आहे.दोन्ही युवा शाहीर प्रथमच आमने सामने येत असल्याने कलगी- तुरा २०२५ च्या मोसमातील ही जुगलबंदी लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जाते,कोकण कलाप्रेमी रसिकांनी,त्याचबरोबर राजापूर वाशीय व भू पंचक्रोशीतील मुंबईकरांनी या कलगी तुरा सामन्याचा आनंद घेऊन शाहिराना व मंडळास कोकणची लोककला जोपाण्यास उपकृत करावे.अधिक माहितीसाठी मंडळाचे सचिव:चंद्रकांत निनावे-९३२६१२१३६९, उपसचिव:दिपक म्हादये -८२०८५ ९७५३८ या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा असे आवाहन उपरोक्त मंडळाचे अध्यक्ष नानु निनावे यांनी केले आहे.
Trending
- कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्यावतीने आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सत्कार !
- कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर
- रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
- कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार
- बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
- चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
- तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !
- लेख : ‘अनुशासन’