मुंबई [उदय दणदणे] : महाराष्ट्रातील कोकण प्रांतात कलाक्षेत्रातील अग्रेसर असणारी कलगी तुरा लोककला शाहिरी परंपरेतील कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी कुणबी समाजोन्नती संघ, (वाघे हॉल) सेंट झेवियर स्ट्रीट,परळ मुंबई- १२ येथे शंकर भारदे (गुरुजी )यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिट्टी मालक,सभासद यांच्या बहुसंख्य उपस्थितीत पार पडली.
सरचिटणीस संतोष धारशे यांनी उपस्थितांचे स्वागत सहर्षस्वागत केले, सदर सभेत दि.३० जुलै २०२४ रोजी झालेल्या सर्व साधारण सभेचे मिनिट्स वाचन चिटणीस सुधाकर मास्कर यांनी केले.त्याच बरोबर ३१ मार्च २०२५ अखेरचा संस्थेच्या कामकाजाचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा अहवाल पत्रक खजिनदार सत्यवान यादव यांनी वाचन करून त्यास स्वीकारून सभागृहातून मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८ या तीन वर्षासाठी नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सुरेश ऐनारकर, उपाध्यक्ष: सुरेश चिबडे, सरचिटणीस:संतोष धारशे, चिटणीस:सुधाकर मास्कर, चिटणीस:दिलीप नामे,खजिनदार: सुरेश कदम,
सदस्य: अनंत तांबे,चंद्रकांत गोताड,शंकर भारदे (गुरुजी),अनंत मुगळे,दीपक म्हादे,दामोदर गोरीवले,अनंत मांडवकर , विश्वनाथ रक्ते,संतोष पारदले,सचिन धुमक,सचिन कदम,प्रसिद्धी प्रमुख-उदय दणदणे अशी प्रतिनिधी मंडळ/ कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती उपरोक्त संस्थेचे नूतन कार्यकारणी सरचिटणीस संतोष धारशे यांनी दिली.
Trending
- कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्यावतीने आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सत्कार !
- कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर
- रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
- कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार
- बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
- चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
- तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !
- लेख : ‘अनुशासन’