पालशेत : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अमूल्य अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा दिवस म्हणून ‘२५ जून’चे स्मरण केले जाते. देशावर लादलेल्या आणीबाणीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपल्या घरादाराचा विचार न करता अनेकांनी कारावास भोगला. त्यांच्या या योगदानाप्रती शासनातर्फे कृतज्ञता व्यक्त करुन कारावास भोगलेल्या पालशेत मधील सन्मानार्थीं श्री.केशवकाका भावे, श्री.शशिकांतनाना बिर्जे, कै.प्रमोद सैतवडेकर यांच्या पश्यात पत्नी तसेच कै.पांडुरंगदादा शिरगावकर यांच्या पश्यात त्यांचे जेष्ठ सुपुत्र या सर्वांना मा.श्री.परीक्षित पाटील, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गुहागर यांनी शासनातर्फे सन्मानपत्र देऊन नुकतच गौरव केला. या निमित्ताने कोंड कारूळ जिल्हापरिषद गटाच्यावतीने पालशेत गावातील सन्मानार्थीं श्री.केशवकाका भावे, श्री.शशिकांतनाना बिर्जे, कै.प्रमोद सैतवडेकर यांच्या पत्नी, कै.पांडुरंगदादा शिरगावकर यांचे जेष्ठ सुपुत्र या सर्वांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी भजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अपूर्वाताई बारगोडे, मंगेश रांगळे, नितीन कनगुटकर, नाना पालकर, राहुल सैतवडेकर, महेश तोडणकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

