मुंबई (प्रतिनिधी ) : ‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत ठेऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सत्कार करते. संस्थेच्या वतीने २०२५ सालासाठी देण्यात येणाऱ्या वीर तानाजी मालुसरे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र मालुसरे यांची निवड केली आहे. दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेच्या वतीने यापूर्वी श्री. संभाजी राजे छत्रपती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे, प्रो. मोहन आपटे, श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. प्रमोद मांडे, श्री. पी. आर. मुंडले, प्रा. पी. के. घाणेकर, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. सुनील पवार व डॉ. सुचित्रा ताजणे यांना पुरस्काराने तर महावीरचक्र प्राप्त कॅप्टन मोहन ना. सामंत, शौर्य चक्र व सेना मेडल प्राप्त भा. नौ. निवृत्त ले. कर्नल तुषार जोशी, निवृत्त लेफ्ट. कर्नल एस. एस. हेरवाडकर, निवृत्त मेजर अनिल माटवणकर, निवृत कॅप्टन प्रफुल तावडे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले आहे. रवींद्र मालुसरे यांना यापूर्वी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ मुंबई, नगरमित्र पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्ली सन्मान पुरस्कार इत्यादीनी गौरविले आहे. मालुसरे हे मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष असून पोलादपूर अस्मिता या वाचनीय ब्लॉगचे मुख्य संपादक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडावर त्यांचा अभ्यास असून यावर त्यांनी विविध दैनिकांनातून विपुल लेखन केले आहे. याशिवाय शिवकार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी होणाऱ्या अनेक संस्थांच्या उपक्रमात सक्रिय सहभागी होत असतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास करण्यासाठी ‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)’ ची स्थापना डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला जागतिक स्थान मिळवून देणे हे ‘श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)’ चे मुख्य उद्दिष्ठ आहे.
याच उद्देशाने डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील १० महान योद्ध्यांशी केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या सर्व योद्ध्यांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे सिद्ध केले आहे. या पुस्तकाला ग्रंथालय भारतीचा पुरस्कार परमपुज्य मोहनजी भागवत यांच्या हस्ते मिळाला आहे.
श्रीमती. प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती), श्री. मोहन भागवत, श्री. उदयनराजे भोसले, श्री. अशोक चव्हाण, श्री. अण्णा हजारे, श्री. मनोहर जोशी, श्री. पृथ्वीराज चव्हाण, श्री. राज ठाकरे, श्रीमती. वर्षा गायकवाड यांनी पुस्तकाला शाबासकीची थाप दिली आहे.
या पुस्तकावर आधारीत ‘शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ या मराठी डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती केली आहे. तसेच हि फिल्म इंग्रजी, हिंदी, कन्नड, संस्कृत आणि बंगाली मध्ये भाषांतरित केली आहेत.
या सन्मान पुरस्काराबद्दल मालुसरे यांचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Trending
- रवींद्र मालुसरे यांना श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेचा शिवकार्यासाठी पुरस्कार जाहीर
- कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्यावतीने आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सत्कार !
- कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर
- रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
- कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार
- बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
- चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
- तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !