Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्र

जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJuly 26, 2025Updated:July 26, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई  : महसूल विभागाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. जनसंवाद, लोकशाही दिन आदी माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री.बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन लाभार्थ्यांना घरांसाठी पट्टे उपलब्ध करुन द्यावेत. नवीन वाळू धोरण आणि मार्गदर्शक सूचनांनुसार वाळू उपलब्ध करुन द्यावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून खर्च करण्यात यावा. पाणंद रस्त्यांना क्रमांक देऊन दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. लोकअदालत सारख्या माध्यमांतून अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्या येत्या तीन महिन्यात पूर्ण कराव्यात. याचबरोबर जिवंत सातबारा, तुकडेबंदी, शेतरस्ता, भोगवटादार 2 मधून 1 मध्ये करण्याची तसेच आकारी पड जमिनीची प्रकरणे, स्वामित्व योजनेचा लाभ देणे आदी कामे देखील कालमर्यादेत मार्गी लावावीत, असे निर्देश त्यांनी दिले. रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा अहवाल सादर केला.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleलोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘विनती ऑरगॅनिक’ या कारखान्यात स्फोट; १ कामगाराचा मृत्यू
Next Article महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.