ठाणे [आकांक्षा नार्वेकर] : रत्नागिरी शहरातील भगवती बंदर परिसरात राहणाऱ्या मच्छी विकणाऱ्या महिलेची कन्या संजना सारंग यां स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी झाल्या आहेत. नुकताच संजना सारंग यांनी ठाणे जिल्ह्यात वाडा पोखरण येथे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या ‘ब’ गटातील अधिकारपदाच पदभार स्वीकारला आहे.
संजना सारंग यांनी २०१२ मध्ये मत्स्य अभियांत्रिकीच्या पदविकेसाठी प्रवेश घेऊन २०१८ मध्ये मत्स्य विज्ञानाची पदवी प्राप्त केलेली आहे. संजना सारंग यांचे वडील सुरेश सारंग यांची मुलीन पद्व्युत्तर शिक्षण घ्यावं खूप इच्छा होती. म्हणून संजना सारंग यांनी २०२० साली मत्स्य प्रक्रिया तंत्र या विषयात पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केल. वडिलांची पद्व्युत्तर शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. पण, आनंद साजरा करण्यासाठी वडील हयात नसल्याने त्यांना त्यावेळी फार वाईट वाटले.
संजना सुदेश सारंग यांनी विद्यार्थी वर्गाला एक संदेश दिला आहे कि, प्रत्येकाने अकरावी पासुनच ध्येय निश्चित केले पाहिजे. मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी खूप अगोदर पासून सुरु केली पाहिजे. म्हणजे, यश निश्चित मिळेल. विद्यार्थ्यांनी उत्तम भवितव्यासाठी परिश्रम केले पाहिजेत. आपल्या करिअर बाबत गांभीर्यपूर्ण यांनी विचार करून अभ्यास केला पाहिजे. इयत्ता अकरावीपासून स्पर्धा परीक्षांची दिशा निश्चित केली पाहिजे. आपल योग्य क्षेत्र निवडून तयारी करावी असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

