चिपळूण (श्रीकांत कांबळी) : मुंबई गोवा हायवे चे काम गेले अनेक वर्ष संथ गतीने सुरू आहे. त्याचा फटका यावर्षीही मुंबईसह इतर शहरातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्ड्यांच्या साम्राज्याचे जाळे पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कसरत करीत प्रवास करावा लागणार आहे. तसेच रस्त्यांची अवस्था पाहता अपघाताची शाश्वती टाळता येत नाही. चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यावर आवाज उठविला असता सार्वजनिक बांधकाम विभाग व हायवे ठेकेदार यांच्याकडून तात्पूर्ती मलमपट्टी केली जाते. मात्र पुन्हा खड्डे पडल्यामुळे नागरिकांमधून प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

