रत्नागिरी (राधा लवेकर) : मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथील लोटे एमआयडीसी मधील विनती ऑरगॅनिक लिमिटेड कंपनी मधील कामगार सुरक्षा नियमांकडे झालेल्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २६ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात समीर खेडेकर रा.घाणेखुंट ह्या स्थानिक कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात खेड पोलिसांनी कंपनीचे मालक विनोद सराफ, मॅनेजर महादेव महिमान, सुरक्षा अधिकारी सुरेंद्र जाधव, आणि प्लांट इन्चार्ज जयंत भगत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६, १२५, ३ आणि ५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की, कंपनीत कामगार सुरक्षेच्या कोणत्याही आवश्यक उपाययोजना केल्या नव्हत्या. सुरक्षा उपकरणांची अनुपलब्धता, नियमित तपासणीचा अभाव, आणि प्रशिक्षणाच्या तुटवड्यामुळे हे भीषण अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, कामगार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मृत समीर खेडेकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, योग्य नुकसानभरपाई आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी चौघा आरोपींना नोटीस बजावून पुढील चौकशी सुरू केली असून, कंपनीमध्ये सुरक्षा उपायांची पाहणी करून तपशीलवार अहवाल तयार केला जात आहे. औद्योगिक सुरक्षेच्या नावाखाली होणारा हा गोंधळ आणि निष्काळजीपणा कामगारांच्या जीवावर उठतोय, ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी म्हटले आहे.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

