गुहागर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना गुहागर तालुका विभागाच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ पाटपन्हाळे ग्रामपंचायतिच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह शनिवारी दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गुहागरचे तहसीलदार परीक्षीत पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ पाटील, होमगार्ड तालुका समुपदेशक सुधाकर कांबळे, सहाय्यक महसूल अधिकारी सचिन गवळी, गुहागर पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष स्वप्निल बारगोडे, सेवानिवृत्त पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, सर्व गुहागर तालुका पोलीस पाटील कार्यकारणी सदस्य व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
मा. तहसीलदार परीक्षीत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या स्वागतासाठी पोलीस पाटील श्रीमती वासंती आंबेकर यांनी ईशस्तवन स्वागतपद्य म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अरविंद पड्याळ आणि खजिनदार सौ. भक्ती गद्रे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सेवेतून निवृत्त होणारे पोलीस पाटील अहमद दाउद मस्तान (सुरळ), सत्यवान गडदे (तवसाळ), सत्यप्रकाश चव्हाण (पाटपन्हाळे), यशवंत पवार (पवारसाखरी), महादेव सोलकर (मढाळ), भिकाजी धावडे (पिंपळवट), कृष्णा रामाणे (विसापूर) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मा.तहसीलदार परीक्षीत पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यां सर्वांनी उपस्थित पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले व निवृत्त झालेल्या सर्व पोलीस पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून पोलीस पाटील तालुका कमिटी, महेश भाटकर, अनिल घाडे, विशाल बेलवलकर, किरण धनावडे, सुजीत शिंदे, सौ अनुजा वाघे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव अरविंद पड्याळ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

