गुहागर [उदय दणदणे] : महावितरण कंपनी अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा मुळे गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठ येथील सत्यवान भायनाक कुटुंबियांना गेले काही दिवस घरचा विद्युत प्रवाह बंद असल्याने अंधारात राहावे लागत आहे. त्यांच्या घरा शेजारील दिपक शिरगावकर यांच्या दुकानासमोरील रस्त्यानजीक असलेल्या वीज खांबावर स्पार्क होत असल्याने तसेच सदर वीज खांब जीर्ण अवस्थेत असल्याने येथील लाईनमन यांना वीज खांबावर चढून काम करणे धोकादायक बनले आहे, सदर समस्या भायानक यांनी पालशेत मनसे विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांना सांगताच सदर बाबत मनसेचे पालशेत विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांनी महावितरण कंपनी पालशेत व्यवस्थापक तसेच उपअभियंता गुहागर यांना फोन द्वारे तात्काळ सदर घटनेची माहिती देऊन सदर धोकादायक वीज खांब त्वरीत बदलण्याची मागणी केली आहे.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

