चिपळुण (राधा लवेकर) : चिपळूणात ‘हिट अँड रन’ ची घटनां समोर येत आहे. सदरचा प्रकार आज मंगळवार दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास कावीळ तळी येथे घडलाआहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते जयद्रंथ खाताते ह्यांच्या मुलाने भरधाव कारने एका वृद्ध पादचार्याला जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश कळकुट्टी (वय 50) यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक पळून गेला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी चालक पळ काढत असल्याने “राजकीय नेत्यांच्या मुलांना कायद्याचा धाक नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नागरिकांनी अपघातानंतर काही काळ रस्ता रोखून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदरच्या घटनेचं अधिकच तपास पोलीस करीत आहेत.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

