गुहागर : गुहागर तालुक्यातील आबलोली या विकसनशील बाजारपेठेमध्ये जयगड खाडीवरील नियोजित तवसाळ सांडे लावगण या पुलाच्या कामाकरता सिमेंट वाहतूक करणारा ४५ टनी सिमेंट बल्कर रस्त्यालगत उभा असताना मुख्य रस्त्यालगतची जमीन खचल्याने कलंडला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जिथे बल्कर कलंडला आहे तिथे विनोद कदम यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून सावर्डे तवसाळ या मुख्य रस्त्यावरील आबलोली बाजारपेठेतील संरक्षक भिंत सुद्धा या बल्करच्या धक्क्याने जमिनदोस्त झाली आहे.या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश सुर्वे यांनी तात्काळ अपघात स्थळी भेट दिली .परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्या घराला धोका निर्माण झाला आहे त्या ठिकाणी भेट देऊन घरमालक श्री विनोद कदम आणि कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.हे करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता योगेश थोरात, गजेंद्र सकपाळ, दिपक दणाने अशोका बिल्डकॉन कंपनीचे प्रतिनिधी जगन्नाथ काळे, ॲड विशाल दुबेप्रतिनिधी यांना प्रत्यक्ष बोलावत कलडंत असलेल्या बल्कर पासुन कोणताही धोका होऊ नये याकरता तेथे रात्रभर उपस्थित असणारे आबलोली गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील महेश भाटकर,ग्राम विकास अधिकारी सुर्यवंशी,तलाठी महोदय, पोलीस बीट अधिकारी किशोर साळवी, अमोल गायकवाड यांच्या समवेत एकत्रित चर्चा करत कंपनीच्या प्रतिनिधींना नुकसानग्रस्त घराची पाहणी करून झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी समन्वय करून दिला. त्याचबरोबर येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणा निमित्ताने या आबलोलीसारख्या विकसिनशील बाजारपेठेत होणारी वाहतुकीची गर्दी आणि कोंडी लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने संरक्षक गोष्टींचे आवश्यक ते नियोजन करण्यास निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.
Trending
- गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
- तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
- आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
- अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
- कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
- “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

