Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » मांडवा पोलिसांकडून आगरसुरे येथील अवैध दारूचा साठा जप्त
महाराष्ट्र

मांडवा पोलिसांकडून आगरसुरे येथील अवैध दारूचा साठा जप्त

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaAugust 19, 2025Updated:August 19, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रायगड : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलिसांनी आगरसुरे येथे छापा टाकून धडक कारवाई करत देशी दारूच्या बाटल्यांच्या साठ्यासह आरोपीला अटक केली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आगरसुरे ते बामणसुरे रोडवरील म्हात्रे पोल्ट्री समोरील मोकळ्या जागेत एक व्यक्ती अवैधरित्या दारूच्या बाटल्यांचा साठा करून तो बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून प्लास्टीकच्या एकूण २३५ बाटल्या जप्त केल्या असून एकूण १९ हजार ५२० रुपये किमतीचा साठा जप्त केला असून आरोपी वसंत पांडुरंग म्हात्रे (वय ७५), रा. आगरसुरे, ता. अलिबाग, जि. रायगड यांच्याविरुद्ध पो.शि. सौरभ अनंत पाटील (वय२८) मांडवा सागरी पोलीस यांनी फिर्याद दाखल केली आहे.   यानुसार आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर त्याच दिवशी रात्री ९ वाजुन ५१ मि. वाजता मांडवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोह ए. व्ही. करावडे हे करीत आहेत.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात अवैधरित्या चालणार्‍या प्रत्येक अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार येत्या काळात मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध व बेकायदेशीर धंद्यावर कडक कारवाई केली आहे व यापुढेही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे, यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. जागृत नागरिकांनी आपल्या परिसरात चालणारे बेकायदेशीर धंदे यांची माहिती पोलिसांना द्यावी, सदर माहिती देणार्‍यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन मांडवा पोलिसांनी केले आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleआबलोलीत सिमेंट बल्कर रस्त्यालगतची जमिन खचुन रहात्या घरानजिक कलंडला
Next Article पत्रकारांनी शासनाच्या योजना, प्रकल्पांची सकारात्मक प्रसिध्दीव्दारे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.