Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » कोतळुक ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीमध्ये सचिन ओक यांचा मोठा विजय
Uncategorized

कोतळुक ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीमध्ये सचिन ओक यांचा मोठा विजय

कट्टर भास्कर जाधव समर्थक अजय बादावटे यांची पत्नी सौ असावरी बादावटे यांचा पराभव ; महायुतीचा महाविकास आघाडीला मोठा दणका
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaSeptember 24, 2025Updated:September 24, 2025No Comments3 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर :  गुहागर तालुक्यातील अग्रणी असणाऱ्या कोतळुक ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीमध्ये गुहागर तालुका भाजपाचे सरचिटणीस आणि कोतळुक ग्रामपंचायत मध्ये गेली १३ वर्षे सदस्य म्हणून काम करणारे सचिन ओक यांनी महाविकास आघाडी उबाठा गटाच्या आसावरी बादावटे यांचा ६ – ४ मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केला आहे.

सचिन ओक हे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असुन मागील ५ वर्ष तालुका सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. कोतळुक ग्रामपंचायतच्या २००७ सालच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही या पराभवाची चिंता न करता कोतळुक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहिले यानंतर २०१२,२०१७,२०२२  मध्ये सलग ३ टर्म सदस्य म्हणून निवडून आले. यातील काही वेळा सर्व उमेदवार बिनविरोध होऊन ज्या ठिकाणी सचिन ओक सदस्याच्या निवडणुकीसाठी उभे राहिले फक्त त्याच एका जागेसाठी सुद्धा निवडणूक झाल्याचे चित्र होते मात्र अशा परिस्थितीतही ओक वेगवेगळ्या वार्ड मधून सदस्य म्हणून निवडून येत होते .२०१२,२०१७ साली उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिन ओक यांना विजयाने हुलकावणी दिली. मात्र सचिन ओक यांनी आपला गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास सोडला नाही आणि याचाच परिपाक म्हणून नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये सचिन ओक याना समर्थन देणारे त्यांच्यासह फक्त ३ सदस्य असताना उबाठाच्या उमेदवाराचा ६ – ४ ने पराभव करत सचिन ओक विजयी झाले आहेत. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला उबाठा गटाला हा मोठा दणका म्हणता येईल.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच त्यावेळच्या शिवसेनेचे म्हणजेच भास्कर जाधव गटाचे वर्चस्व होते आणि त्यावेळी शितल गोरिवले या उपसरपंच झाल्या होत्या. मात्र यावेळी हा झालेला बदल म्हणजेच सचिन ओक यांचे सर्व समावेशक कार्य आणि नव्याने निर्माण झालेली महायुती याचाच विजय म्हणता येईल. या विजया बद्दल बोलताना सचिन यांनी माझे उपसरपंच पद हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आजपर्यंतचे प्रयत्न करत आहेत त्या माझ्या प्रयत्नांची प्रेरणा वाढवणारे असेल. सतत २ निवडणुकां मी हरल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे नाराज न होता मीच कुठेतरी कमी पडलोय असे म्हणून मी पुन्हा नव्याने काम करत राहिलो.कायमस्वरूपी  गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास नजरेसमोर होता आणि याचमुळे आज १० सदस्यांपैकी ६ सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला जी ४ मते विरोधात गेली आहेत त्याबद्दल माझा कोणताही आकस नाही. या सर्वांना बरोबर घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने कोतळुक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

या विजया बद्दल माजी आमदार डॉ.विनय नातू.भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेठ शिगवण,माझी महिला बालकल्याण सभापती सौ नीलम गोंधळी, नंदूशेठ गोंधळी, माजी सभापती विलास लांडे,गणपत शिगवण,जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य नेत्राताई ठाकूर,नवनीत ठाकूर,गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी सरपंच दत्ताशेठ ओक,भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश रांगळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जैतापकर , तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे,दीपक मोरे प्रसिद्ध उद्योजक अरुण शेठ गांधी, साईनाथ कळझुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अपुर्वाताई बारगोडे, वेळंब ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीकांत मोरे ,सोशल मीडिया सेलचे दीपक मोरे ,ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते प्रकाश वीर आधीसह महायुती घटक पक्षातील सर्व पदाधिकारी आणि मित्र परिवाराने सचिन यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleप्रशासकीय इमारती आता नमुना नकाशानुसार बांधणे बंधनकारक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next Article “कोकणचा साज,संगमेश्वरी बाज” लोकनाट्याचा पार्ल्यातील मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रयोग
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.