गुहागर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्र नेते पंतप्रधान मान. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिवस दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोबर या दरम्यान सर्व शासकीय विभाग सेवा पंधरवडा राबवत आहेत. या निमित्ताने चिपळूण उपविभागाचे कार्यतत्पर उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे साहेब यांनी बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी काताळे ग्रामपंचायतीमधे काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तवसाळ खुर्द येथे रेवस रेड्डी महामार्गावरील महत्त्वाकांक्षी असा जयगड खाडीवरील तवसाळ खुर्द ते सांडे लावगण हा पूल आणि जोड रस्ता यासाठी संपादित झालेल्या जमिनींचे खातेदार यांचे संमती पत्र करून त्यांचे करारनामे करून घेण्याचे शिबिर राबविले. उपविभागीय अधिकारी श्री लिगाडे साहेब यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तवसाळ खुर्द महसूल गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या विभागाला दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी श्री लिगाडे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सर्व ग्रामपंचायतीनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणारे कायमस्वरूपाचे आणि लोक लोकोपयोगी रस्ते गाव नकाशावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील सरकारी जमिनी त्यावरील अतिक्रमणे किंवा सरकारी जमिनीवर अत्यावश्यक असणारी नागरिकांची घरे याबाबतचा दुसरा टप्पा राबविला व तिसरा टप्प्यामध्ये या उपविभागामधील प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ वरीष्ठ महाविद्यालय यामध्ये अत्यावश्यक असणारे दाखले त्या त्या ठिकाणी देण्याचे उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तवसाळ खुर्द या ठिकाणी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सागरी महामार्ग साठी आवश्यक असणारा जयगड खाडीवरील तवसाळ – सांडे लावगण हा महत्त्वकांक्षी होणारा पूल आणि यासाठी संपादित होणाऱ्या जमिनींच्या जमीन मालकांना अत्यावश्यक ते करार करून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे साहेब यांनी हा सत्य उपक्रम राबवीला.

उपविभागीय अधिकारी लिगाडे साहेब हे मागील २ वर्षांमध्ये चिपळूण विभागामध्ये असे विविध समाज उपयोगी, लोकोपयोगी आणि निसर्ग पूरक असे अनेक उपक्रम राबवत आहेत याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुकही केले. याच दरम्यान ज्या काताळे ग्रामपंचायत मध्ये या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते ती ईमारत नुकतीच सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे,उपसरपंच श्री प्रसाद शांताराम सुर्वे आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद यांच्या विशेष प्रयत्नाने पालकमंत्री महोदय श्री उदयजी सामंत साहेब, माजी आमदार डॉ.विनय नातू साहेब,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निलेश सुर्वे यांच्या विशेष सहकार्याने उभारण्यात आली आहे. या सुसज्ज व भव्य ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे उपविभागीय अधिकारी श्री आकाश लिगाडे साहेब, तहसीलदार श्री. परीक्षीत पाटील साहेब यांनी व त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व सहकारी अधिकारी यांनी कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष शिबिरासाठी उपस्थित असणारे उपविभागीय अधिकारी श्री. आकाश लिगाडे साहेब, तहसीलदार श्री. परीक्षित पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे, ग्रामपंचायत माजी सरपंच नम्रता निवाते,सदस्य मधुकर अजगोलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय मोहिते, तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष श्याम गडदे, तवसाळ गणपती मंदिर देवस्थान उपाध्यक्ष राजेश सुर्वे, रत्नदीप गडदे, विलास सुर्वे,तलाठी सचिन परदेशी, मंडळ अधिकारी ठसाळे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी घडशी साहेब, तवसाळ काताळे पोलीस पाटील सचिन रसाळ, पडवे पोलीस पाटील बाळू शेठ गांधी, नरवण पोलीस पाटील रत्नाकांत जाधव परिसरातील इतर पोलीस पाटील,ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका आधी सह बहुसंख्य जमीनदार व नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तलाठी श्री सचिन परदेशी, ग्रामपंचायत लिपिक अमोल सुर्वे, दीपक बारस्कर सोनाली पंडित, मंगेश झगडे, कोतवाल सौ.निमुणकर यांनी सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वात विशेष मेहनत घेतली.

