Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
महाराष्ट्र

सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaOctober 2, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई  : विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी आपापल्या रेल्वेच्या डब्यात विजयदशमी हा सण जोरदार पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही साई भजन मंडळ (डोबिवली – दिवा) यांनी अतिउत्साहीत आणि जल्लोषात साजरा केला. यावेळी वारकरी परंपरा जपत या मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुश बोरगे बुआ यांनी एक देश, एक गणवेष असे दाखवून दिले. उपाध्यक्ष श्री. प्रवीण मेढेकर बुआ यांनी आपल्या मध्य, पश्चिम, हार्बर या तिन्ही मार्गाचे सर्व भजन मंडळ कमिटीचे अध्यक्ष श्री. हनुमंत तावडे महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन मानाने सत्कार केला, यांचवेळी साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र युट्युब चॅनेल आणि डिजिटल मीडियाचे डोंबिवली प्रतिनिधी श्री. दिनेश हुमणे यांचा सत्कार अध्यक्ष अंकुश बोरगे यांच्या हस्ते करण्यात आला. यांचबरोबर डोंबिवली स्थानकचे रेल्वे मास्तर, रेल्वे पोलीस अधिकारी, आणि मोटरमन यांचाही सत्कार करण्यात आला.

       भजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री. प्रवीण मेढेकर यांनी भजनाच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करून भजन परिसर दुमदुमून टाकले. प्रत्येकाचे पाय या गाडीकडे आकर्षण करीत होते. गाडी पूर्णपणे हार, फुगे, पताके, लावून पारंपारिक पद्धतीने सजविली जाते. नारळ वाढवून गाडीची आणि देवीची पूजा, आरती केली जाते. यंदा पूजेचा मान श्री. उमेश घरवे आणि दिपक कांबळे यांना मिळाला. हा रोजचा येण्याजाण्याचा प्रवास सुखकर व्हावा याचे गाऱ्हाणं घालण्यात सर्व भजन आणि प्रवासी हातभार लावत असतात, यावेळी सुधीर सावंत, विकास हळदवणेकर, राकेश गायकवाड, विजय वर्दम, अशोक शिंदे, सचिन बेलकर, विनय विचारे, प्रदीप कदम, प्रशांत नारकर, सुदर्शन सांगले, नितीन देवकर, दिगंबर बच्छाव, श्रीकांत रामाने, संतोष निकम, सुभाष केंजळे, कृष्णा साळवी, सुरेश मोरे, मंगेश खळे, प्रशांत थोरवे, नंदकिशोर आग्रे आणि या भजन मंडळात महिलांचा समावेश आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. आदी मंडळी उपस्थित होती. आणि अश्याप्रकारे ७:२९ डोंबिवली ते सीएसटी प्रवासाने विजयादशमी साजरी झाली.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleछ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
Next Article उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.