Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

सुंकाई मातेचा मुख्य होलिकोत्सव धुलीवंदन दिवशी
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 25, 2026Updated:February 25, 2026No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram
अडूर [दिनेश खेडेकर] : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील अडूर गावात ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचा वार्षिक होलिकोत्सव दि. २२ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या उत्सवातील सर्वात आकर्षणाचा आणि थरारक भाग म्हणजे पेटत्या होमातून धावत भक्तांचा पाठलाग करणारा संकासुर. ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी जिल्हा तसेच परजिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
ग्रामदेवतेची पहिली होळी फाल्गुन पंचमीला प्रज्वलित होते. त्यादिवशी देवीच्या खेळ्यांची भोवनी चतु:सीमेतील कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांत पार पडते. निवडक भोवनीचे खेळे झाल्यानंतर फाल्गुन दशमी (दि. २६ फेब्रुवारी) रोजी पाचवी होळी तर फाल्गुन एकादशी (दि. २७ फेब्रुवारी) रोजी सहावी होळी साजरी केली जाणार आहे. या दोन्ही दिवशी नवीन व जुनी गावकी नमन मंडळांच्या सादरीकरणासह सायंकाळी भाटी मैदानावर पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार अनुभवायला मिळणार आहे. फाल्गुन त्रयोदशीला भोवनीच्या खेळ्यांची सांगता होईल, तर फाल्गुन चतुर्दशीला होळी सणाच्या दिवशी ग्रामदेवता सुंकाई देवीची रूपे लावण्याचा कार्यक्रम पार पडेल.
फाल्गुन पौर्णिमा, म्हणजेच धुलीवंदन दिवशी मुख्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी ग्रामदेवता सुंकाई मातेची पालखी मंदिरातून सहाणेकडे आणण्यात येईल. वारकरी भजनाच्या गजरात माडहोळी घेऊन देवीच्या होमाभोवती पाच प्रदक्षिणा घालून होमाला अग्नी दिला जाईल. त्यानंतर सुंकाई देवी व पावणाई देवी यांच्या होमाभोवती वाजत–गाजत मिरवणूक काढून पालखी सहाणेमध्ये स्थानबद्ध केली जाईल आणि महाआरती होईल. याच दिवशी दुपारी अडूर, कारूळ, बोऱ्या व बुधल या गावांच्या चतु:सीमेची बैठक आयोजित करून ग्रामदेवतेची पालखी घरोघरी भोवणीसाठी नेण्याचे नियोजन केले जाईल. रात्री १० वाजता सुंकाई देवी ग्रामस्थ मंडळ, अडूर यांच्या वतीने बहुरंगी नमन कलेचे सादरीकरण होणार आहे.
धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्यात येईल. यावेळी ग्रामदेवता सुंकाईसह विविध देवस्थानांना मानकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून प्रसाद व खजूर वाटप केले जाईल. त्यानंतर ग्रामदेवतेची पालखी मराठा समाज व श्री पड्याळ देवाच्या मानाच्या स्थानी नेऊन गाऱ्हाणे घालण्यात येईल. पुढील दिवसांपासून पालखी घरोघरी भोवणीसाठी नेली जाईल.
Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleत्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
Next Article आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026270 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025250 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025232 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.