Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
  • डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

लोकसंस्कृतीची पंढरी पालशेत नगरीत आई हसलाई देवीच्या खेळ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत !
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 25, 2026No Comments3 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पालशेत [ उदय दणदणे ] : गुहागर तालुक्यात वरवेली गावाची आई हसलाई देवीचे खेळी यांनी फाकपंचमीला आई हसलाई देवी मंदिरात थाप मारून सोमवारी पारंपारिक वेश धारण करून अनवाणी पायाने गावभोवनीलाबाहेर पडले. सोमवारी पालशेत येथे येऊन येथील ग्रामदेवतेला झोलाई- महालक्ष्मी साकडे घालून पालशेत गावातील मानाची घरे घेतली. आई हसलाई देवीचे खेळी यांचा सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातून संकासूर प्रेमींनी मोठ्या संख्येने पालशेत येथे हजेरी लावली होती. आधीच पालशेत बाजारपेठ तसे गर्दीचे ठिकाण असून त्यात बाहेरून आलेली गर्दी त्यामुळे पालशेत बाजारपेठ परिसर दुसऱ्या होळीला गजबजून जातो. हि अनेक वर्ष्यांची परंपरा आजमितीस टिकून आहे. आई हसलाई देवीचे खेळी म्हणजे समस्त गुहागर वासियांचे श्रद्धास्थान आहे.
कोकणात प्रामुख्याने गुहागर मध्ये जोपसलेली लोकसंस्कृती देवखेळे आणि संकासूर श्रद्धेची महती जाणून घेत पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, रत्नागिरी जिल्हा अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी समस्त देवखेळ्यांना शुभेच्छा देत, नमन लोककलेची माहिती आणि देवखेळ्यांच्या प्रति असणारी लोकांची श्रद्धा आणि लोकभावना जाणून घेतल्या, प्रसंगी देवखेळे लोकसंस्कृतीच्या माध्यमातून लोकगीतांतून होणारे समाजप्रबोधन, संकासूर दैवताप्रति भाविकांची असलेली अपार श्रद्धा आणि देवखेळे सोहळ्यात भाविकांची उसळलेली अलोट गर्दीने वातावरण अगदी भक्तीमय होते. त्याचबरोबर सोहळ्या दरम्यान रुग्णवाहिकांना वाटचाल करुन देत वाहतूक कोंडीवर स्वतः भाविकांनी नियंत्रण ठेवत भाविकांनी शिस्तबद्धता पाळली होती,या सोहळ्याचे प्रत्येक क्षण नयनी टिपताना व देवखेळ्यांशी सवांद साधताना, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे आणि सहकारी पोलीस प्रशासन अगदी भारावून गेले. प्रसंगी झी ५ ओटीटीवर प्रसारीत झालेली देवखेळ वेबसिरीज वर बंदी आणण्यासाठी विनंती करण्यात आली असून सदर बाबत पोलीस प्रशासन सकारात्मक भूमिकेत असल्याचे राजहंस नमन मंडळ वरवेली (रांजाणेवाडी)अध्यक्ष अनिल रांजाणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका हा शिमगोत्सवातील लोकसंस्कृतीचे केंद्रबिंदू मानला जात असून येथे नमन, देवखेळे लोककला मोठया श्रद्धेने मनोभावे जोपासली जात जाते. गुहागर तालुक्याला देवखेळ्यांची शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. तालुक्यात फाल्गुन पंचमी पासून ग्रामस्थ मंडळी ग्रामदेवतांच्या रूढी परंपरेनुसार चतुर्थ सीमेबाहेर गावभोवनी साठी देवखेळी म्हणून बाहेर पडले असून यातील पारंपरिक वेशभूषेतील संकासूर,नटवा, देवीचे प्रतिरूप म्हूणन गोमू (कोलिन) मृदूंग वादक व लोकनृत्य सादरीकरण करणारे देवखेळी विशेष आकर्षणाचा तितकाच श्रद्धेचा भाग मानला जातो. दरम्यान तालुका गुहागर सह असणारी गावे पालशेत, वेळणेश्वर, असगोली, अडूर, बुधल, हेदवी,शृंगारतळी, याठिकाणी देवखेळी आणि संकासूर पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु यावर्षीचा गुहागर मधील शिमगोत्सवात उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे झी ५ ओटीटीवर प्रसारित झालेली “देवखेळ” वेबसिरीज मध्ये संकासूर दैवताचे अवमानकारक चित्रण झाल्याने येथील लोकभावना तीव्र दुखावल्याने निषेधाचे सावट पसरलेचे पाहायला मिळते.

तालुक्यातील प्रामुख्याने वरवेली रांजाणे वाडी, वरवेली शिंदेवाडी, अडूर, पालपेणे,साखरी आगर, उमराठ,असोरे,वाडदई आदी गावातील देवखेळ्यांनी ग्रामदेवतेच्या मंदिरातून “देवखेळ” वेबसिरीज बंद व्हावी असा आरज लावून आणि निषेध नोंदवून गावभोवनी साठी चतुर्थ सीमेबाहेर पडले आहेत. या दरम्यान सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी तालुक्यातील राजहंस नमन मंडळ वरवेली (रांजाणे वाडी) यांचे देवखेळी आणि संकासूर यांचे प्रतीवर्षीप्रमाणे पालशेत येथील मानकरी यांच्या घरी आगमन होताच भाविकांची मोठी गर्दी झाली होती, पालशेत येथे गेले शेकडो वर्षे तालुक्यातील विविध ग्रामदैवतां च्या देवखेळ्यांना मानाचे स्थान दिले दिले जाते, त्यांचे मोठया जल्लोषात स्वागत केले जाते.
गेले महिनाभर गुहागरवासीय तसेच नमन लोककलेचं जतन संवर्धनार्थ आणि लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढणारी “नमन लोककला संस्था संलग्न गुहागर तालुका शाखेच्या” वतीने शांततेच्या व संविधानिक मार्गाने हाती घेण्यात आलेली “देवखेळ वेबसिरीज” बंदी आणण्यासाठी निषेध चळवळ तीव्र करण्यात आल्याने प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यात भाग पडले आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleअडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
Next Article तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
गुहागर

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय

February 11, 2026
Top Posts

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025248 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025225 Views

कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!

February 11, 2026173 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.