रत्नागिरी प्रतिनिधी : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्यालयाच्या २९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाची क्रीडा स्पर्धानी सुरुवात झाली.. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्तिकीरण पुजार यांनी श्रीफळ वाढवून या स्पर्धांची सुरुवात केली. यानंतर गतवर्षीच्या सर्वोकृष्ट क्रीडापटू सनील उकार्डे आणि साईस्वरूप मांडवकर यांनी क्रीडाज्योत व ध्वज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री.दिनेश सिनकर यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.. कॅरम स्पर्धेने या स्पर्धांची सुरुवात झाली. ‘कामासोबत शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी खेळ हा उत्तम पर्याय आहे ‘ असे मनोगत पुजार सर यांनी व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मु.का.अ. श्री.परीक्षित यादव , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) श्री.विजयसिंह जाधव, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- रामपूर येथे CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू पिकाच्या लागवडीचे प्रात्यक्षिक
- नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
- वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
- सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह
- ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
- शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
- आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती