Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » रोहा तालुक्यातील इंदरदेव येथे ४८ घरे वणव्यात जळून खाक
महाराष्ट्र

रोहा तालुक्यातील इंदरदेव येथे ४८ घरे वणव्यात जळून खाक

सुदैवाने जीवित हानी नाही; वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू शकलेले नाही.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaMarch 7, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रायगड प्रतिनिधी : रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगर वाडी येथील ४८ घरे वणव्यात जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू शकलेले नाही. उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. यातील काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित असतात. यामुळे जंगलातील वनसंपदेचे नुकसान होते. त्याचबरोबर आसपासच्या मानवी वस्तीलाही या वणव्यांची झळ बसते. रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीतील रहिवाश्यांना याचाच प्रत्यय आला.

वाडीवरील रहिवाशांना गुरुवारी सायंकाळी वणवा वाडीपरिसरात पसरल्याचे लक्षात आले. मात्र तोवर वणव्याने चहू बाजूने वाडीला वेढले होते. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी तातडीने रोहा येथून अग्नीशमन दलाला तसेच एसव्हीआरएस बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरीकही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत ४८ घरे जळून खाक नष्ट झाली.

▪️वणव्याचे दुष्परिणाम : सातत्याने लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्यांचे हकनाक बळी जातात. सुरुवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्याच्या घटना मागील काही वर्षात समोर आल्या आहेत. वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबडय़ा, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे वन्यजीव आता दिसेनासे होत चालले आहेत. कोकणात १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleस्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री राऊत यांना ‘एक्सलन्स डॉक्टर अवॉर्ड’ प्रदान
Next Article राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम. जे. प्रदीप चंद्रन यांची केली नियुक्ती !
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.