Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अंबरनाथ शाखेच्या ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास दिला नकार; मनसे कार्यकर्त्यांनी कॅबिनमधून घुसून विचारला जाब
ठाणे

‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अंबरनाथ शाखेच्या ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास दिला नकार; मनसे कार्यकर्त्यांनी कॅबिनमधून घुसून विचारला जाब

बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला इशारा
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaApril 3, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

अंबरनाथ प्रतिनिधी : एअरटेल गॅलरी, डीमार्टमध्ये मराठी बोलण्यावरुन झालेल्या वादाची प्रकरणे ताजी आहेत. त्यात मनसेने संबंधितांना दणका दिला होता. आता बँक ऑफ महाराष्ट्रच्या अंबरनाथ शाखेतही असाच प्रकार समोर आला आहे. अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याची घटना समोर आली. त्यानंतर संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन गोंधळ घातला. यावेळी मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचं पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी बुधवारी अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते. यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितलं. त्यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला. त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असं उत्तर दिलं. तेव्हा संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये  घुसून जाब विचारला. तसेच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleसाहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे
Next Article नाशिकमध्ये केवळ १ रुपयासाठी पानटपरी चालकाने ग्राहकाचा घेतला जीव
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.