कार्ला प्रतिनिधी, शेखर म्हात्रे : गुरुवार दि. ३-४-२०२५ पासून आई एकविरा देवीचा चैत्र यात्रा आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हिंदू नवं वर्ष गुढीपाडवा पासून सुरु होणाऱ्या चैत्र नवरात्री उत्सव पासून श्री क्षेत्र एकविरा कार्ला गड येथे आई एकविरा च्या चैत्र यात्रेला सुरुवात होते. महाराष्ट्र आणि कान्याकोपऱ्यातून आई एकविरा यात्रेला भाविक भक्तगणं पायी चालत पालख्या घेऊन चैत्र यात्रेत आले आहेत.कार्ला गडावर चैत्र यात्रा आणि पालखी उत्सव मोठया जल्लोषात भाविकांच्या उस्ताहात सुरु आहे. बुधवारी आई एकविरा चा भाऊ बहिरीदेव (काळ भैरवनाथ) यांची पालखी माहेरघर असलेल्या देवघर इथे सुरु झाली. म कार्ला गड वेहेरगाव येथे मोठया उस्ताहात यात्रा व पालखी सोहळा सुरु आहे.आपटा कोळीवाडा ची मानाची पालखी, गोवंडी चेंबूर कोळीवाडा ची मानाची पालखी, कासारवडवली गावची पालखी, ओवळा गावाची पालखी, खरापटी कोळीवाडा रोहा ची पालखी, भोईवाडा कल्याण ची पालखी, अर्नाळा पनवेल ची पालखी, गव्हाणपाडा मुलुंड ची पालखी, अश्या अनेक मानाच्या पालख्या पदयात्रा करत कार्ल्यात पोहोचल्या.
महाराष्ट्राच्या कान्यांकोपऱ्यातून भाविक पालखी सह आई एकविरा च्या यात्रा पालखी व दर्शनाला आलेले आहेत. तर वरून राजाने सुद्धा हजेरी लावली. ढगाचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासोबत वरून राजाने हजेरी लावली.वातावरनात गारवा निर्माण झाला होता परंतु भाविक नाराज सुद्धा झाले. आई एकविरा पालखी सोहळ्यात नाचण्याचा आनंद घेता आला नाही. सगळीकडून चिखल झाला होता. परंतु भाविक आनंदी सुद्धा होता. आपटा कोळीवाडा पनवेल येथील पालखीला पाहिला मान मिळाला आई एकविरा पालखी सोहळ्याचा. पाऊस कमी झाल्यानंतर बँड, बँजो, डीजे च्या तालावर भाविकांनी मनमुराद आनंद लुटला.
महाराष्ट्रातील लोणावळ्यात कार्ल्याच्या लेणी जवळ आई एकविरा देवीचे मंदिर आहे. आगरी-कोळी समाजाचे बांधव येथे आईच्या पूजेसाठी येतात.हे कुणबी समाजाच्या लोकांची कुलदैवत देखील आहे. या मंदिरामध्ये एकसारख्या बांधणीची एका ओळीत बांधलेली मूळच तीन मंदिरे पश्चिममुखी आहे.अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्रात येथे भाविकांची गर्दी ओसंडून येते. येथे पशुबळी देण्याची प्रथा देखील आहे. हे देवस्थान जागृत आहे. ही देवी चमत्कारिक आहे.ही देवी आई नवसाला पावणारी आहे.महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्याने येथे सतत वर्दळ असते.आगरी कोळी समाजाचे भाविक येथे पूजेसाठी येतात .चैत्र महिन्यात या मंदिरात पालखी सोहळा होतो. चैत्र महिन्यात भाविकांची गर्दी असते.
कार्ला निवासीनी शक्तीदायीनी एकविरा आई(एकविरा आई) महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदिमाता रेणुका ही परशुरामाची माता होय. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र किर्ती मिळवली, म्हणुन एका विर पुत्राची आई म्हणंजेच एकविरा माता होय. ‘एकवीरेति विख्याता सर्वकामप्रदायिनी सह्याद्रिखंडता असा उल्लेख सापडतो कि शंकरानेच आईला एकविरा हे नाव देउन ठेवले आहे. आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. आईची मुर्ती स्वयंभु तांदळा दगडात प्रगटलेली “शेन्दुंर चर्चीत” आहे. आईचे नेत्र मिन्यापासून बनवलेले आहेत. आईचे रुप प्रसन्नकारी आहे. एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे.
आईच्या डाव्या हाताला आईची नणंद “जोगेश्वरी देवीची“ शेन्दुंर चर्चीत मुर्ती आहे. अश्विन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सावाच्या यात्रा होतात. कोळी, आगरी, कुणबी, सोनार, कायस्थ, पाठारेप्रभु, चौकळशी, पाचकळशी, क्षात्रीय, वैश्य इ. समाजाची आई एकविरा कुलस्वामीनी आहे. त्यामुळे ठाणे, मुबई, रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते. विशेषकरून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात. जगभरातुन भाविक आईच्या दर्शनाला येतात.
दिवसेंदिवस एकविरेच्या भक्तांमध्ये वाढ होत आहे. आईच्या मंदिरा शेजारी “ प्राचीन बौध्द इतिहासप्रसिध्द कार्ला लेणी“ आहेत. येथील शिल्प चैत्यगृह, बौध्दशिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्ठकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिध्द आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. इंद्रायणी नदी, विसापूर, लोहगड, तुगं हे नयनरम्य गड किल्ले कार्ला गडावर चढताना दृष्टीस पडतात.
श्री एकविरा देवी विश्वस्त संस्थानच्या वतीने प्राथमिक सेवासुविधा पुरवित गडावर अनेक सुधारणा केल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत तरे यांच्या अथक प्रयत्नांनी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची, विजेची, राहण्याची, रस्त्यांची, प्रसादाची व दर्शनाची योग्य काळजी घेतली जाते. गडावर लवकरच रोप-वेची सुविधा ही सुरू होणार आहे.
आई एकविरेच्या भक्तांसाठी सदैव तत्पर असलेले श्री एकविरा देवी विश्वस्त संस्था प्रामाणिकपणे आईची सेवा समजून अहोरात्र भक्तांसाठी काम करत असते. संस्थेच्या वतीने गडावर यात्रा, पालखी, होमहवन, जागरण, गोंधळ, भजन, किर्तन, व्याख्याने असे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. आईच्या जगभरातील भाविकांसाठी विश्वदर्शन आईची वेबसाईट बनवली आहे. त्यामुळे आईचे दर्शन अर्थात विश्वदर्शन झाले आहे. जगातून कुठूनही आईचं दर्शन घेणं आता सोप्प झालं आहे.
एकविरा आईचे मंदीर दररोज पहाटे ५ ला उघडले जाते मंदीरात गुलाबजल, अत्तर, गोमूत्र शिंपडून स्वच्छ पवित्र वातावरण निर्माण केले जाते. तांदळा दगडात कोरलेली शेंदूर चर्चित आई एकविरेच्या मुळ मुर्तीची पहाटे ५.३०ला काकड आरती केली जाते, ६ वाजून ३० मिनीटांनी अभिषेकाला सुरुवात होते.
सुरुवातीला आईच्या डाव्या बाजूस असलेल्या जोगेश्वरी देवी (आईची नणंद) हिचा यथोचित अभिषेक केला जातो, मंदीरात सर्वत्र उदबत्ती-धूपाचा सुगंध पसरतो घंटीचा नाजुक स्वर आणि सडोपचार एकविरा आईच्या मंत्राचा जप अशा मंगळमय प्रसन्नमय वातावरणात आई एकविरेच्या अभिषेकाला सुरवात होते आईला पंचामृताने सडोपचाराने अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावर आईला नविन वस्त्रे परिधान केली जातात, मग आईला सुवर्ण मुखवटा चढवला जातो त्यानंतर आईला सुवर्ण अलंकाराने मढवलं जातं. फुलानीं आईला सजवल जात सुगंधी चाफ्याच्या फूलांचा हार देवीला घातला जातो.
मोगरा-आबोलीच्या फूलाचीं आईला वेणी घातली जाते. आईचं साजशृंगार झाल्यावर आईची आरती केली जाते, आईचे सर्वविधी हे ब्राम्हणांच्या हस्ते होतात, आईचं ते प्रसन्न रुप पाहुन मन अगदी उल्हासित होतं. मनात नविन चैतन्यं निर्माण होतं आलेल्या भाविकाचं नाव व गोत्र यांचा संकल्प सोडला जातो. कुणा भक्ताला स्वहस्ते अभिषेक करावयाचा असल्यास देवस्थानच्या माध्यमातूनं रु.१००० (एक हजार रूपये)ची पावती फाडून भाविक स्वहस्ते अभिषेक करू शकतात.