Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
महाराष्ट्र

शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaApril 7, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram
रत्नागिरी प्रतिनिधी (स्वाती हडकर) : शासनाच्या विविध निर्णयांची कोटेकोर अंमलबजावणी गावागावात अंगणवाडी सेविका प्रमाणिकपणे करीत असतात. त्यांच्यामुळेच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचत असतात आणि यशस्वी होतात. अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी,असे सांगतांनाच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
अंगणवाडी सेविकांच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
‘नाम’च्या माध्यमातून गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या..
जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भातही आज पालकमंत्री डाॕ सामंत यांनी आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, जलसंधारण, जलसंपदा आणि यांत्रिकी विभागाने नद्यातील गाळ काढण्याच्या संदर्भात नियोजन करावे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढावा. वाशिष्टी नदीसाठी साडेसात कोटी मंजूर आहेत. त्याचे काम सुरु करा. धामणसे येथेही गाळ काढण्याबाबत सुरुवात करावी. अन्य ठिकाणचा आराखडा तयार करावा. नाम फाऊंडेशनही यंत्रणा राबवून गाळ काढण्याच्या कामकाजाला सुरुवात करावी.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाहीत, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. त्यांना नाहक त्रास होईल, असे निर्णय जिल्हास्तरावर होता कामा नये. त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना, येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरविले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष अंगणवाडी सेविकांवर येतो. याची तपासणी करुन अशा निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत.
नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी. त्याबाबतचा प्रस्तावा महसूल यंत्रणेशी चर्चा करुन करावा. रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पुर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही, असे पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.
Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleआई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती
Next Article ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.