नवी मुंबई प्रतिनिधी (शेखर म्हात्रे ) : नवी मुंबईतल्या सिवूड्स येथे DPS शाळेच्या बस चालकाकडून एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार. सदर बस चालकाने हे कृत्य १९ तारखेला केले आहे. पण आज शनिवार रोजी मनसे पदाधिकाऱ्यांनी DPS शाळा मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांना घातला घेराव. यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. मुख्याध्यापकांना सहआरोपी करा अशी मनसेची मागणी आहे.
मुख्याध्यापकांचे मुजोर वर्तन. काल संबंधित पालक मुख्याध्यापकांना भेटले असताना ही त्यांनी कार्यवाही केली नाही. नाईलाजास्तव पालकांना पोलिसांमध्ये जाऊन तक्रार द्यावी लागली. शाळा प्रशासन व मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध घोषणा देवून मनसेने निषेध केला.
मनसेच्या या आंदोलनात मनसे शहर सचिव सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसे विद्यार्थी सेना उप शहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, मनविसे शहर सचिव विपुल पाटील, मनविसे विभाग अध्यक्ष मधुर कोळी, मनसे शाखा अध्यक्ष संदीप कांबळे हे उपस्थित होते.