Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून तुर्भे, कोपरी भागातून ७ बांगलादेशी नागरिकांना अटक
नवी मुंबई

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून तुर्भे, कोपरी भागातून ७ बांगलादेशी नागरिकांना अटक

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 11, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

नवी मुंबई प्रतिनिधी : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तुर्भे एमआयडीसीतील बंगाली पाडा आणि कोपरीगाव सेक्टर-२६ परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यात १ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आले. हे सर्व बांगलादेशी नागरिक ७ ते १४ वर्षांपासून मजुरी व घरकाम करून नवी मुंबईत राहत असल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले.

तुर्भे एमआयडीसीतील मयुर कोल्ड स्टोरेजसमोरील रोडवर भरत नगर, बंगाली पाडा येथे काही बांगलादेशी नागरीक कामावर जाण्यासाठी येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे व त्यांच्या पथकाने तुर्भे एमआयडीसीतील बंगाली पाडा येथे छापा मारला. यावेळी त्याठिकाणी रेणू लुफर सरदार (४६), शर्मिला बिवी सत्तार शेख (३४), अमिना साउदीन खातुन (६) व सिद्दीक अकबर सरदार (३२) हे सापडले. तिघांच्या चौकशीत त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसल्याचे तसेच त्यांनी घुसखोरीच्या मार्गाने भारत बांगलादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून वैध प्रवासी कागपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले.

या कारवाईनंतर कोपरीगाव सेक्टर-२६ मधील साईबाबा मंदिर गेटजवळ देखील काही बांगलादेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एएचटीयूच्या पथकाने कोपरी गाव सेक्टर-२६ भागात छापा मारून फातीमा बरकत शेख (२७), अल्पना बोरहन शेख (२८), सपना किसनदेव पांडे उर्फ मोमिना रोबीयो खातुन (३५) व नैनू इयाईल शेख (४०) या चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे देखील कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे तसेच त्यांनी देखील घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleलोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना ४ लाखांची भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Next Article बृहन्मुंबई महानगरपालिकेला आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी या पुढे घ्यावी लागणार सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.