Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृह व विशेष गृहातील ८ मुली शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पसार
महाराष्ट्र

उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृह व विशेष गृहातील ८ मुली शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पसार

उल्हासनगर शहरात शोध मोहीम राबवून उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात यश आले आहे तर एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना सापडली नाही. तिचा शोध घेतला जात आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 9, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

ठाणे प्रतिनिधी : उल्हासनगर येथील शासकीय निरीक्षण गृह व विशेष गृहातील आठ १५ ते १७ वयोगटातील मुली मंगळवारी सकाळी शयनगृहातील खिडकीच्या जाळ्या तोडून पळून गेल्या. ही माहिती निरीक्षण गृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने उल्हासनगर शहरात शोध मोहीम राबवून उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात यश आले. एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना सापडली नाही. तिचा शोध घेतला जात आहे, असे हिललाईन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहात या अल्पवयीन मुली काही महिन्यांपासून राहत आहेत. त्यांना या निरीक्षण गृहातील सेवासुविधा आवडत नसल्याने आणि मनाजोगे राहता येत नसल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

✍🏻 लेख वाचा –  श्री क्षेत्र दत्त मंदिर, पालशेत

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, उल्हासनगर शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी शासकीय निरीक्षण आणि विशेष गृह आहे. याठिकाणी विविध वयोगटातील मुलींना ठेवले जाते. या निरीक्षण गृहातील सेवासुविधा आवडत नसल्याने काही महिन्यांपासून राहत असलेल्या आठ मुलींनी निरीक्षण गृहातून गुपचूप पळून जाण्याचा निर्णय घेतला. या निरीक्षण गृहातून मुलींना बाहेर सोडले जात नाही. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांची पाळत असते. त्यामुळे मंगळवारी सकाळी शय्यागृहात असताना आठ मुलींनी निरीक्षण गृहातील शय्या गृहातील खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडल्या. एका पाठोपाठ एक खिडकीतून उड्या मारून पळून गेल्या.

निरीक्षण गृहातील कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी शय्यागृहात आला. त्यावेळी त्यांना शय्या गृहात एकही मुलगी नसल्याचे आणि खिडकीच्या लोखंडी जाळ्या तुटल्या असल्याचे दिसले. या मुली पळून गेल्याचा संशय व्यक्त करून निरीक्षण गृहातील अधिकाऱ्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तातडीने उल्हासनगर शहराच्या विविध शोध मोहीम राबवली. त्या आढळून आल्या नाहीत. या मुली उल्हासनगर रेल्वे स्थानकातून पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात शोध मोहीम राबवली. त्यावेळी उल्हासनगर रेल्वे स्थानकातून लोकलने पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी सात अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. इतर एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली. तिचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleलेख : श्री क्षेत्र दत्त मंदिर, पालशेत
Next Article रत्नागिरीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायबर क्राईम कार्यशाळेचे आयोजन
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.