Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » वाढवण बंदरासाठी जमीन हस्तांतरण, आवश्यक परवानगीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत; मुख्यमंत्र्यांचा सक्त आदेश
महाराष्ट्र

वाढवण बंदरासाठी जमीन हस्तांतरण, आवश्यक परवानगीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत; मुख्यमंत्र्यांचा सक्त आदेश

प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबास संबंधित विभागांना जबाबदार धरले जाईल आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 10, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : देशाच्या सागरी व्यापाराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्याोगिक आणि निर्यात धोरणाला चालना देणारा असल्याचे सांगत पालघर विमानतळासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची सूचना त्यांनी केली. यापुढे कोणताही प्रकल्प रखडल्यास सबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच प्रकल्पांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत मुंबईसह राज्यभरातील मेट्रो, रेल्वे, महामार्ग, विमानतळ, बंदरे, सिंचन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १९ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये योग्य संतुलन राखत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून शासनाच्या धोरणांद्वारे विकासाची समान संधी सर्व भागांमध्ये निर्माण केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले.

प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, भूसंपादन, पुरवणी मागणी आणि कार्यवाही प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे तसेच अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबास संबंधित विभागांना जबाबदार धरले जाईल आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleठाणे, पालघर येथील खाडी आणि समुद्र क्षेत्रात अनधिकृत मासेमारी, नौकांवर ड्रोनद्वारे राहणार लक्ष
Next Article कर्वेनगर येथील बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.