लांजा, महादेव गोळवसकर : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्यातील गोळवशी शाळा क्रमांक १ च्या खेळाडूनी घवघवीत यश संपादन केले आहे. चिपळूण डेरवण येथील क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्यातील गोळवशी शाळा क्रमांक १ च्या खेळाडूनी चांगले यश संपादन केले. मुलींचा मोठा गट कबड्डी स्पर्धेत उप विजेता ठरला.गोळवशीच्या खेळाडूंनी केंद्र व बीट स्तरावर अंतिम विजेते पदक मिळवून लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.वैयक्तिक क्रीडा खेळात गोळवशीची स्वरा रामदास जोगले हिने १०० मीटर धावणे, उंच उडी स्पर्धेत केंद्र व बीट स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.खेळाडूंनी अपार मेहनत जिद्द, चिकाटी यामुळेच यश संपादन केले. गोळवशीचे क्रीडाप्रेमी महादेव खानविलकर, मुख्याध्यापक, प्रशिक्षक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने यश मिळवळ्याचे मुख्याध्यापक शांताराम आग्रे यांनी सांगीतले शाळेच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

