Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » पाण्याबरोबरच पायाभूत सुविधा करुन ग्रामपंचायती आदर्श बनवा- उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी

पाण्याबरोबरच पायाभूत सुविधा करुन ग्रामपंचायती आदर्श बनवा- उद्योगमंत्री उदय सामंत

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 18, 2025Updated:January 18, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

रत्नागिरी प्रतिनिधी : सरंपच आणि ग्रामसेवकांनी गावाचे कुटुंबप्रमुख जबाबदारी पार पाडताना स्वच्छ पाण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करावा. आरोग्याची सुविधा, शौचालयांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पाण्याचे स्वच्छ स्त्रोत याबाबत आदर्श ग्रामपंचायत बनवावी, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवनात रत्नागिरी पंचायत समिती पाणी टंचाई निवारणार्थ आढावा बैठक झाली. बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींनी विशेषत: सरपंचांनी शौचालये अतिशय चांगल्या पध्दतीने आणि स्वच्छ राहतील याबाबत लक्ष द्यावे. पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही, ते स्वच्छ असावे, ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामसेवकांनी गावातील राजकारणापेक्षा विकासावर भर द्यावा. दिवंगत आर. आर. पाटील साहेबांनी तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव योजनेच्या माध्यमातून गावागावात अभियान राबविला. त्यादृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतींवर अधिक भर द्यावा.

मिळालेले पाणी ग्रामस्थांपर्यंत स्वच्छ कसे पोहचेल, याचे नियोजन सरपंचांनी करावे. त्याचबरोबर भविष्यातील पाण्याचे नियोजनही आतापासूनच करावे. शाळांच्या इमारतींसाठी 90 कोटी आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 45 कोटी तालुक्यासाठी मंजूर झाले आहेत. शहरातील दामले विद्यालयासाठी 15 कोटी मंजूर झाल्याचे सांगून उद्योगमंत्री पुढे म्हणाले, येणाऱ्या पर्यावरण प्रकल्पांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. त्याचा निश्चितपणे पुढच्या पिढीसाठी फायदाच होणार आहे.

सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रांताधिकारी श्री. देसाई आणि गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी ग्रामपंचायतींना पाणी टंचाईबाबत आढावा घेतला.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleजिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्यालयात २९ व्वे वार्षिक स्नेहसंमेलन
Next Article पुणे महापालिकेत गेल्या ४ वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची पदोन्नतीने नियुक्ती
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.