Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » पुणे महापालिकेत गेल्या ४ वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची पदोन्नतीने नियुक्ती
पुणे

पुणे महापालिकेत गेल्या ४ वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची पदोन्नतीने नियुक्ती

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 18, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पुणे प्रतिनिधी : महापालिकेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नगरसचिव विभागात नगरसचिव या पदाची नियुक्ती पदोन्नतीने केली जाते. ४ वर्षांपूर्वी ३१ ऑगस्ट २०२० रोजी सुनील पारखी या पदावरून निवृृत्त झाले. त्यानंतर कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. ३ वर्षांनंतर दौंडकर निवृत्त झाले. त्यामुळे तत्कालीन राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्याकडेच या विभागाचा कार्यभार होता.

नगरसचिव पदासाठी तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी जानेवारी २०२१ मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती. पात्रतेच्या निकषानुसार होणाऱ्या या पदभरतीसाठी महापालिकेतील २९ अधिकारी इच्छुक होेते. विधी शाखेची पदवी हा त्यासाठी महत्त्वाचा निकष होता. त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यांपैकी एकही उमेदवार पात्र नसल्याने नगरसचिव पदाची नियुक्ती प्रक्रिया विक्रम कुमार यांनी रद्द केली होती. त्यानंतर महापालिकेच्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत भोसले यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्या महापालिकेच्या पहिल्या पूर्णवेळ महिला नगरसचिव ठरल्या आहेत.

दरम्यान, नगरसचिव कार्यालयातील राजकारणाला न जुमानता भोसले यांनी नियमानुसार काम केले आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती योग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, माजी महापौर संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी या नियुक्तीबद्दल भोसले यांचे अभिनंदन केले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleपाण्याबरोबरच पायाभूत सुविधा करुन ग्रामपंचायती आदर्श बनवा- उद्योगमंत्री उदय सामंत
Next Article एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.