Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » बसमध्ये बोलण्यात गुंतवून ३ महिलांनी लाखोंचे दागिने अन् रोकड चोरली
पुणे

बसमध्ये बोलण्यात गुंतवून ३ महिलांनी लाखोंचे दागिने अन् रोकड चोरली

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 18, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पुणे, प्रतिनिधी : मालन गायकवाड या खरेदी खतासाठी लागणारे पैसे देण्याकरिता गावी खंडाळा येथे निघाल्या होत्या. मुंबई-कराड बसने त्या जात होत्या. यावेळी त्यांच्याकडे रोख रक्कम आणि दागिने असलेली बॅग होती. त्यामध्ये मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस, लक्ष्मीहार, अंगठी इत्यादी दागिने तसेच ६ लाख १० हजार रुपये रोख रक्कम होती. प्रवास करताना ही बस लोणावळा वाकड मार्गे नवले ब्रिज येथे आली. त्याठिकाणी बसमध्ये तीन महिला बसल्या. त्यातील एका महिलेकडे लहान मुल होते. या सर्व महिला मालन यांच्याजवळ बसल्या होत्या.

बस नसरापूरजवळ आल्यावर एका महिलेने तुमच्या सिट खाली पैसे पडले आहेत, असे मालन गायकवाड यांना सांगितले. यानंतर या सर्व महिला त्यांच्यापाशी घोळका करत पैसे गोळा करण्यासाठी खाली वाकू लागल्या. तितक्यात एका महिलेने त्यांच्या जवळील पैसे आणि दागिन्यांची बॅग काढून घेतली. यानंतर लगेचच त्या महिला आम्हाला येथे उतरायचे आहे गाडी थांबवा असे म्हणू लागल्या. कंडक्टरने गाडी येथे थांबणार नाही, असे सांगितले असता त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामुळे कंडक्टरने कापरहोळ (ता. भोर) जवळ बस थांबवून त्यांना उतरू दिले.

मालन गायकवाड यांना आपल्या जवळ दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग आढळून आली नाही. त्यामुळे त्या तीन महिलांनी पैसे गोळा करण्याच्या बहाण्याने बॅग चोरल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी त्यांचे पती विलास गायकवाड यांना हा प्रकार फोनवर सांगितला. त्यानंतर ते खंडाळा आले. मग मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये ते बसले. त्यावेळी बस चांदणी चौकात आली असता योगायोगाने त्या तिघं महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एका महिलेने मालन गायकवाड यांना बसमध्ये बसलेले पाहिले असता त्या पुन्हा बसमधून उतरू लागल्या. मालन यांनी त्या महिलेला ओळखले. त्यांनी लगेच आरडा ओरडा करत “हीच ती महिला आहे जिने माझी पैशाची व दागिने असलेली पिशवी चोरली आहे”, असे सांगितले. यांनतर उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवत त्यातील एका महिलेला पकडले. यावेळी तिच्या सोबतच्या इतर दोन महिला पळून जाण्यास यशस्वी ठरल्या. शैलजा राजू भोगे (वय ३८ वर्ष, रा. औरंगाबाद, चिखल ठाणा) असे पकडलेल्या महिलेचे नाव असून बावधन पोलिसांनी तिला राजगड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड ही योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next Article देशातील प्रमुख शहरात ‘विवाहपूर्व समुपदेशन केंद्र’ उभारण्याचा राष्टीय महिला आयोगाचा निर्णय
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.