Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा – सि.ई.ओ. कार्तिकेयन एस.
कोल्हापूर

जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिम प्रभावीपणे राबवा – सि.ई.ओ. कार्तिकेयन एस.

आरोग्य विषयक जिल्हास्तरावरील बैठकीत सूचना ; पीसीपीएनडीटी, क्षयरोग निर्मूलन, बोगस डॉक्टर तपासणी, तंबाखू नियंत्रण समिती तसेच एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaJanuary 30, 2025No Comments3 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

कोल्हापूर प्रतिनिधी : मुलींचा जन्मदर घसरत असल्याने शासनाने आता गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जातात तसेच स्टिंग ऑपरेशनही केले जात आहे. प्रभावीपणे अवैध गर्भलिंग निदान शोध मोहिमेला गती द्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी जिल्हास्तरावरील बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिाया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, डॉ.हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ.फारूख देसाई यांच्यासह संबंधित विषयाचे समिती सदस्य, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, एमएस उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील जन्मावेळीचे स्त्री-पुरुष प्रमाण अतिशय असमाधानकारक असून यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अवैध गर्भलिंग निदान तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून तीन महिन्यानंतर तपासणी करण्याऐवजी अचानक भेटी देऊन वारंवार सोनोग्राफी करणाऱ्या ठिकाणी तशा प्रकारच्या चाचण्या होतात का याची तपासणी करा. यावेळी सोबत रेडिओलॉजिस्ट घेऊन जा. त्या मशीनचे एफ फॉर्म तपशीलवार पहा. ही मोहीम राबवीत असताना आरोग्य विभाग तसेच शासकीय दवाखाने यांनी समन्वयाने कामकाज करा. मोठ्या प्रमाणात हल्ली पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान तपासणी केली जाते याचा शोध घ्या. तसेच अवैध मार्गाने गर्भपाताची औषधे विकली जातात का याचीही तपासणी करा. यासाठी ठिकठिकाणी छापा टाकून एजंट तसेच डॉक्टर यांचे नेटवर्क शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करा. ही मोहीम यशस्वी करायची असेल तर आरोग्य विभागातील संबंधित यंत्रणेला प्रत्यक्ष काम करावेच लागेल. गर्भपातासाठी आलेल्या महिलांचा इतिहास जाणून घ्या. ज्या ठिकाणी बंद मशीन्स आहेत त्या ठिकाणी त्या मशीन्स नेमक्या बंद आहेत किंवा नाहीत याची खात्री करा. या मोहिमेबाबत जिल्ह्यात जनजागृती करा अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.

बोगस डॉक्टर तपासणी मोहिमेलाही गती द्या असे त्यांनी बैठकीत सांगितले. प्रत्येक तालुक्यामध्ये या बैठका नियमित स्वरूपात घेणे अपेक्षित आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ही बैठक झाली पाहिजे. या तपासणीसाठी एक तपासणी सूची तयार करून संबंधित तपासणी अधिकाऱ्यांना द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेत नव्याने दवाखाना सुरू होत असताना त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा जवळील शासकीय दवाखान्यातील प्रमुखाचे ना हारकत प्रमाणपत्र घ्या. याबाबत ग्राम स्तरावर काही चुकीचे डॉक्टर्स आढळून येत असतील किंवा ग्रामस्थांच्या लक्षात आल्यास याबाबतचा तपशील प्राधान्याने पोलीस पाटील यांनी देणे बंधनकारक आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बोगस डॉक्टरबाबत स्वतंत्र अशी ‘तक्रारपेटी’ ठेवा. या बोगस डॉक्टर बाबतची तपासणी मोहीम ३१मार्चपर्यंत पूर्ण करा असे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण समिती च्या बैठकीत ही मोहीम राबवीत असताना जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी एकत्रित तपासणी मोहीम राबवा. शासकीय कार्यालयात तसे अधिकारी कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केल्याचे तपशील पुढील वेळी पासून सादर करा. पोलीस विभाग तसेच आरोग्य विभागाने आपल्या दंडात्मक कारवाईच्या संख्येत वाढ करा. उपस्थित अशासकीय सदस्यांनी शालेय स्तरावरील व परिसरातील युवकांमध्ये वाढत्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे मुद्दे मांडले व त्यावर उपाययोजना राबवण्यासाठी विनंती केली. यावेळी बैठकीत जीबीएस या आजारावरती चर्चा झाली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जीबीएस बाबत आवश्यक माहिती लोकांना द्या. जिल्ह्यात तीन केसेस मिळाले आहेत त्या ठिकाणच्या परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन संबंधित पाण्याचे स्त्रोतही तपासा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. क्षयरोग निर्मूलन अभियानांतर्गत संधीग्ध रुग्णांच्या एक्स-रे संख्या वाढवा. जिल्ह्यात क्षयमुक्त अभियानासाठी मोहीम राबवून टीबीमुक्त गावाबरोबरच टीबीमुक्त जिल्हा लवकरात लवकर आपणाला करायचा आहे त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक झाली. यात जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी माहिती सादर केली. या बैठकीत खाजगी दवाखानात्यातील एचआयव्ही बाधितांची माहिती जिल्हा केंद्रास मिळावी. यामुळे पुढिल एचआयव्ही संक्रमण रोखण्यास उपाययोजना राबविता येतील असे त्या म्हणाल्या. तसेच या बैठकीत कोल्हापूर शहरातील वेश्या व्यवसायातील महिलांच्या समस्यांवरही चर्चा झाली.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये जनजागृती रॅली
Next Article ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’तून रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.