नागपूर प्रतिनिधी : ‘वी केअर मीडिया’ आणि ‘नॅशनल हेल्थ मिशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केल्या जाणाऱ्या ‘एक्सलन्स डॉक्टर अवॉर्ड’ ने प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. राजश्री प्रफुल राऊत यांना नुकतच सन्मानित करण्यात आले.
महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉ. राजश्री राऊत या जिवांकुर फर्टिलिटी सेंटर च्या संस्थापक आहेत. तसेच, सध्या त्या भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत असून, त्यांनी अनेक महिलांना वंध्यत्व, पीसीओएस, गर्भधारणा समस्या आणि मासिक पाळीशी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन केले आहे. तसेच, किशोरींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळेच त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि त्यांना या गौरवाने सन्मानित करण्यात आले. डॉ. राजश्री राऊत यांनी हा पुरस्कार महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या समर्पणाला अर्पण केला आहे.

