Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..
  • तांत्रिक शिक्षणात मराठीचा ठसा; महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
  • आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..
  • अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम. जे. प्रदीप चंद्रन यांची केली नियुक्ती !
पुणे

राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम. जे. प्रदीप चंद्रन यांची केली नियुक्ती !

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaMarch 7, 2025Updated:March 7, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पुणे प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या गेले ११ महिन्यापासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारने एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी सायंकाळी काढले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांची ११ महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर ही पदे रिक्त होती. प्रदीप चंद्रन यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेला एक अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. महापालिकेत आणखी एक अतिरिक्त आयुक्त पद मात्र अद्यापही रिक्तच आहे.

मुंबईतील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) या पदावर सध्या एम. जे. प्रदीप चंद्रन कार्यरत होते. भंडारा जिल्हाधिकारी म्हणूनदेखील त्यांनी काम केलेले आहे.  पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी काढण्यात आले. आज ते अतिरिक्त पदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्या वेळी राज्य सरकारने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त या आयएएस अधिकाऱ्यांसह उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकाऱ्यांच्या जागेवर अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती.

मुंबई पाठोपाठ महत्वाची आणि दुसऱ्या क्रमांकाची महापालिका म्हणून पुणे महापालिकेकडे पाहिले जाते. पुणे शहरात राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे दोन खासदार आहेत. यापैकी एक खासदार केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करतात. आठ आमदारांपैकी सात आमदार भाजपचे आहे. यामध्ये एक कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. असे चित्र असतानाही गेले ११ महिन्यापासून महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर सत्ताधाऱ्यांना एकही अधिकारी नियुक्त करता न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleरोहा तालुक्यातील इंदरदेव येथे ४८ घरे वणव्यात जळून खाक
Next Article मधमाशांच्या हल्ल्यामुळे शिवनेरी गडावर जाण्यासाठी वनविभागाकडून बंदी !
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026
गुहागर

आई हसलाई देवी वरवेलीचे खेळी निघाले गावभोवनीला..

February 25, 2026
गुहागर

अडूरमध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी पेटत्या होमातून धावणार संकासुर

February 25, 2026
Top Posts

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणा; डॉ.ढेरे खुलासा करणार का?..

March 4, 2026260 Views

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025249 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025230 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.