Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
  • डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
  • कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
  • हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
  • उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
  • सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
  • छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
  •  डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » चर्नी रोड परिसरातून ६१ वर्षीय पादचारी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळालेल्या आरोपीच्या ५ तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र

चर्नी रोड परिसरातून ६१ वर्षीय पादचारी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळालेल्या आरोपीच्या ५ तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaMarch 17, 2025No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

मुंबई प्रतिनिधी : चर्नी रोड परिसरातून जाणाऱ्या ६१ वर्षीय पादचारी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळालेल्या आरोपीला पाच तासांत अटक करण्यात डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (डी. बी. मार्ग) पोलिसांना यश आले. आरिफ झाकीर शेख (२०) असे या अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सराईत असून त्याच्याविरोधात यापूर्वीही जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. इतर गुन्ह्यांतील त्याच्या सहभागाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार पुरबी भार्गव वैद्य (६१) दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात वास्तव्याला आहेत. शुक्रवार, १४ मार्च रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास त्या गिरगावातील मामा परमानंद मार्ग येथून चर्नी रोडच्या दिशेने जात होत्या. यावेळी एका अज्ञात चोराने त्यांच्या हातातील पर्स हिसकावली. त्यावेळी त्यांनी आरोपीला विरोध केला. पण त्याने तेथून पळ काढला. चोरीला गेलेल्या पर्समध्ये रोख १५ हजार रुपये, बँकेची चार डेबिटकार्डे, एक क्रेडिट कार्ड, आधारकार्ड आणि पॅनकार्ड अशी महत्त्वाचे कागदपत्रे होती. वैद्य यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी डीबी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख व पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास तुपे, प्रशांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गौरव तंवर, विवेक वणवे, पोलीस हवालदार संदीप तळेकर, पोलीस शिपाई मयुर पालवणकर यांच विशेष पथक स्थापन केले. या पथकाने परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यावेळी आरोपी पळालेल्या मार्गाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खऱ्यांमार्फत शोध घेतला असता आरोपीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी संशयीताला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने महिलेची पर्स चोरल्याचे कबुल केले.

आरोपीकडून रोख १५ हजार रुपये, डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. महिलेनेही आरोपीला ओळखले असून आरोपी सराईत चोर असल्याची माहिती पोलिसानी दिली. त्याने मरीन ड्राईव्ह व इतर परिसरातही अशा प्रकारे चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. त्याआधारे पोलीस आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहात तपासत आहेत. आरोपीला याप्रकरणी अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleपुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए,एनएचएआय आणि महानगरपालिका यांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई
Next Article गुहागर मधील ७ वर्षाच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
Team GuhagarSatta

Related Posts

ठाणे

डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..

January 5, 2026
महाराष्ट्र

सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा

October 2, 2025
गुहागर

छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम

September 25, 2025
Top Posts

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025244 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025219 Views

कविता : वायरमन..!

January 13, 2025164 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.