देव पाहिला का? मंदिरातील पाहिलाय पण माणसातील बघितला आहे का, नाही ना. आम्ही फक्त बोलतो कि देव माणसात आहे पण बघण्याची दृष्टी मात्र कोणी ठेवत नाही.. हे मान्य करायला शिकलोय कि देव दगडात नसून माणसात आहे परंतु; खरंच ती जोपसली जात आहे का? आपल्याला सवय होऊन गेली आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याच गोष्टीकडे फारसे लक्ष जात नाही, स्वतःच स्वतःमध्ये व्यस्त असणारा माणूस कधी कोणाची कमी जाणवूनच घेत नाही पण वेळ निघून गेल्यावर समजायला लागते त्या वेळी लक्ष देऊन थोडंसं आपलं जग बाजूला ठेऊन आजूबाजूला बघितलं असत तर कदाचित समजलं असत कि देव जवळच आहे पण शोधायला वेळ कोणाकडेच नाही. देवाला प्रत्यक्ष भेटणं जमत नाही म्हणून देवाने देवदूत सारखी माणसं आयुष्यात पाठवलेली असतात. कधी आपण देव बनून मदत करायची असते तर कधी आपल कोणीतरी करतो..
मानवाच्या रुपी आलेला भगवंत आपल्याला कधी समजतो ज्यावेळी त्या नरदेहातून आत्मा निघून गेल्यावर. तो देह त्याला देव वाटू लागतो.. जिवंतपणी कधी त्याच्या पायाला स्पर्श करून पाया पडले नसतील तेवढे लोक त्या मृत देहाकडे बघून नमस्कार करतात, तेंव्हा दिसतो का त्यामध्ये देव? स्वतःवर खरंच करताना विचार करणारे आपण मेल्यानंतर न मागताच अंगावर कित्येक कपड्यांचा ढीग बघायला मिळतो, फुकट या दुनियेत कहिचं मिळत नाही तरीही मेल्यानंतर मात्र फुले, हारांमधून शरीर चं दिसत नाही, तेंव्हा दिसतो का देव?
आपली विचारशक्ती आणि मानसिकता अशीच केली आहे कि जिवंतपणी नाही तर मेल्यानंतर एखाद्यासाठी सगळं केल जाते ते कशासाठी? धावपळीच्या युगात कोणालाच कोणाकडे बघायला वेळ नसतो हे जरी खरे असले तरी एखाद्याच्या अंतविधी साठी वेळात वेळ काढून जातो किती विचित्र आहे ना.. तुमचं आमचं सारखंच, माणूस गेल्यानंतर दाखवलेली काळजी, केलेला आटापिटा काही कामाचा नसतो. कितीही ओळख करून जगा पण घरचेच शेवटी राहतात.
हजारोच्या संख्येने माणसं जमा होतात, काय फायदा ती माणसं बघायला ती व्यक्तीचं नसेल तर.. चार दिवसाचं आयुष्य आहे माणसाने माणूस होऊन माणुसकीने जगत राहिले पाहिजे आहोत तोपर्यंत जपा, त्यामधील देव ओळखा. मेल्यानंतर देव माणण्या पेक्षा जिवंतपणी माणुसकीने जगा…!