ठाणे प्रतिनिधी ( विशाल मोरे ) : ठाणे, कळवा पटणी मैदान येथे ४ मे रोजी भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वैष्णवी स्पोर्ट्स दाभीळ, ता दापोली यांच्यातर्फे करण्यात आले असून सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सदर स्पर्धेत प्रवेश फी म्हणून रु.३०००/- ठेवण्यात आली असून प्रथम पारितोषिक रु.२२,२२२/- तर द्वितीय पारितोषिक रु.११,१११/- व आकर्षक चषक तसेच मालिकावीर चषक, सामनावीर चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक, उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक तसेच उत्तेजनार्थक सहभागी संघास चषक असा बक्षीसांचा आरास आयोजकांकडून ठेवण्यात आला असून ही स्पर्धा अधिक चर्चेचा विषय ठरली आहे.
स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या २४ संघांना प्राधान्य दिले असल्याचे सदर स्पर्धेचे आयोजक दिलीप मोरे, प्रणेश मोरे यांनी आमच्या प्रतिनिधिंशी बोलताना सांगितलं आहे. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

