पालशेत : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अमूल्य अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा दिवस म्हणून ‘२५ जून’चे स्मरण केले जाते. देशावर लादलेल्या आणीबाणीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपल्या घरादाराचा विचार न करता अनेकांनी कारावास भोगला. त्यांच्या या योगदानाप्रती शासनातर्फे कृतज्ञता व्यक्त करुन कारावास भोगलेल्या पालशेत मधील सन्मानार्थीं श्री.केशवकाका भावे, श्री.शशिकांतनाना बिर्जे, कै.प्रमोद सैतवडेकर यांच्या पश्यात पत्नी तसेच कै.पांडुरंगदादा शिरगावकर यांच्या पश्यात त्यांचे जेष्ठ सुपुत्र या सर्वांना मा.श्री.परीक्षित पाटील, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गुहागर यांनी शासनातर्फे सन्मानपत्र देऊन नुकतच गौरव केला. या निमित्ताने कोंड कारूळ जिल्हापरिषद गटाच्यावतीने पालशेत गावातील सन्मानार्थीं श्री.केशवकाका भावे, श्री.शशिकांतनाना बिर्जे, कै.प्रमोद सैतवडेकर यांच्या पत्नी, कै.पांडुरंगदादा शिरगावकर यांचे जेष्ठ सुपुत्र या सर्वांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी भजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अपूर्वाताई बारगोडे, मंगेश रांगळे, नितीन कनगुटकर, नाना पालकर, राहुल सैतवडेकर, महेश तोडणकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- कोंड कारूळ जिल्हा परिषद गटाच्यावतीने आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या जेष्ठांचा सत्कार !
- कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर
- रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
- कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार
- बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
- चारवाडी विकास मंडळ मुंबई वतीने कलगी तुऱ्याचे आयोजन; भू-पंचक्रोशीतील युवा शाहीर प्रथमच आमने सामने
- तवसाळ शाळा-१ च्या कु.शुभ्रा निलेश सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका !
- लेख : ‘अनुशासन’