मुंबई : पावसाळ्यात वातावरण व समुद्र स्थिती खराब होत असल्याने १ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत प्रवासी वाहतूक व मासेमारीस शासनाकडून दरवर्षी बंदी घातली जाते. त्यामुळे समुद्रातील प्रवासी वाहतूक व मासेमारीस बंदी असते. तरीही दरवर्षी काही मच्छिमार हे या बंदी काळात जीवावर उदार होऊन शासन आदेश डावलून मासेमारीसाठी जातात. त्यात त्यांना समुद्रातील अपघाताला सामोरे जावे लागते. यात मनुष्यहानी नेहमी होते. नुकतीच खांदेरी किल्ल्याजवळ मच्छिमारीसाठी गेलेल्या ‘तुळजाई’ बोटीला खडकाला आपटून जलसमाधी मिळाली. त्यात ८ खलाशी होते त्यापकी ५ खलाशी ९ तास पोहत किनाऱ्यावर आले व ३ जणांना आपला जीव गमवावा लागला. याला कोण जबाबदार असा प्रश्न सर्वांना पडला आहे?
शनिवारी दिनांक २६ जुलै रोजी शासनाने समुद्रात लाल बावटा लावून धोक्याचा इशारा दिला होता. तरी देखील उरण करंजा येथील मनोज गणपत कोळी यांच्या मालकीची ‘तुळजाई नावाची बोट (IND MH 7MM 1405) २६ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास करंजा बंदरातून मासेमारीसाठी निघाली होती. खांदेरी किल्ल्यानजीक समुदात लाटाच्या जोरदार पहारामुळे बोट पलटी होऊन जलसमाधी मिळाली. बोटीत एकूण ८ खलाशी होते. बोटीतील पाच मच्छीमार हेमंत गावंड (आवरें), संदीप कोळी व टीशन कोळी (करंजा), शंकर भोईर व कृष्णा भोईट (आपटा, पनवेल) हे ९ तास पोहत किनाऱ्यावर आले होते.
घटनेची माहिती मिळताच मांडवा पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पोहत आलेल्या ५ जणांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मांडवा पोलीस समुद्रात बुडालेल्या ३ जणांचा पोलीस शोध घेत होते. अखेर तब्बल ५० तासांच्या शोधानंतर मंगळवारी सकाळी तिघांचे मृतदेह सापडले. नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा, उरण) आणि मुकेश यशवंत पाटील (डा. करना, उरण) अशी मृत मच्छीमारांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह अनुक्रमें सासवणे, दिघोडे व किहीम किनाऱ्याजवळ आढळले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संपूर्ण कोकण परिसरात हा शासनाचा प्रवासी वाहतूक, मासेमारीस बंदी आदेश सक्त काटेकोरपणे पाळला जातो. मात्र रायगड जिल्ह्यातच या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. तर प्रशासन या घटनांकडे कसे पाहत आहे? याची रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारी लोकांमध्ये प्रचंड संताप पहावयास मिळत आहे. आता प्रशासन काय कायदेशीर कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

