विरार : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून मनपा प्रशासनास अल्टिमेट देऊन ही निवेदनाच्याद्वारे केल्या मागण्याची पूर्तता न केल्याने वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निष्क्रिय, भ्रष्ट आणि बेजबाबदार कार्यपद्धतीविरोधात नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने संताप व्यक्त केला आहे.अखेर योगा योगाने पितृ पक्षातच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विरार पश्चिम विराटनगर येथील हिंदू स्मशानभूमीतून मनपा मुख्यालयापर्यंत प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलना सुरवात करणार अशी माहिती वसई विरार शहर जिल्हा अध्यक्ष महेश कदम आणि सहकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
महासंघाने सादर केलेल्या निवेदनात मनपाच्या कारभारातील गंभीर त्रुटी, भ्रष्टाचार आणि नागरिकांविषयीची निष्काळजी वृत्ती ठळकपणे मांडली आहे. नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याऐवजी मनपा प्रशासनाने त्यांना नरकासमान परिस्थितीत जगायला भाग पाडत असल्याचे कदम यांनी म्हटले होते.
निवेदनातील ठळक मुद्दे
१. स्मशानभूमीची दुरावस्था – लाकडांची टंचाई, पावसात भिजलेले लाकूड, बेकायदेशीर पैशांची वसुली, संशयास्पद खर्च व भ्रष्टाचार.
२. खड्डे आणि निधीचा अपव्यय – दरवर्षी डागडूगीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींचा अपव्यय, पुढील वर्षी त्याच खड्ड्यांची पुनरावृत्ती.
३. अनधिकृत बांधकामांचा पूर – पेल्हार, फुलपाडा, कारगिल नगर, सहकार नगर, कुंभारपाडा इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे; संबंधित अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यात दुर्लक्ष.
४. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन – नागरिकांना बंधनकारक माहिती न देणे, चुकीच्या पद्धतीने जनमाहिती अधिकारी नियुक्त करणे.
५. मनपा कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार –
गणेश पाटील : सरकारी सेवेतील निवृत्ती वडिलांचे नावे मनपाची फसवणूक करून वैद्यकीय देयक वसुली.
राहुल पवार : निलंबन काळातही पोलिस वर्दी परिधान करून नागरिकांना धमकावणे.
विजय गोतमारे : निलंबन असूनही प्रभाग समिती-सी मध्ये सतत वावर.
६. चार निलंबित ठेका अभियंता यांनी पालिकेची प्रतिमा मलिन करून ही पुन्हा सेवेत दाखल कोणत्या कारणाने घेतले त्याचे स्पष्टीकरण जनतेला द्या..
७. जीर्ण अनधिकृत इमारतींचा प्रश्न –
नागरिकांचे जीवन धोक्यात, तातडीने पुनर्वसनाची गरज.
८. आरोग्य सेवांचा अभाव – एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. यांसारख्या मूलभूत तपासण्या उपलब्ध नाहीत; नागरिकांना खाजगी रुग्णालयांत आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते.
९. मूलभूत अधिकारांचा भंग – जीवन व सन्मानाने जगण्याचा अधिकार हिरावला गेला.
१०. कार्यालयीन शिस्तभंग – अधिकारी-कर्मचारी वेळेत न येणे, ओळखपत्र न घालणे, हालचाल नोंदवही ठेवली जात नाही.
११. बेकायदेशीर पद्धतीने ठेक्यावर
विविध विभागात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशा करा.
इत्यादी संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून ठळक मागणी निवेदन देऊन ठोस सुधारणा करण्यासाठी सर्व हिंदू स्मशानभूमींचे तात्काळ नूतनीकरण व सुविधा सुधारणा, कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते बांधकाम व हमी कालावधी प्रणाली लागू करणे,
अनधिकृत बांधकामांवर कारवाई व दोषी अधिकाऱ्यांना निलंबन, आरटीआय कायद्याची सक्तीने अंमलबजावणी, भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायमची सेवामुक्ती, जीर्ण अनधिकृत इमारतीतील नागरिकांचे तातडीने पुनर्वसन, म्हाडा व SRA च्या सहभागातून पुनर्वसन धोरण, रुग्णालयांत आधुनिक तपासण्या उपलब्ध करणे, कार्यालयीन शिस्तीचे काटेकोर पालन करणेकामी १० दिवसाच्या अल्टिमेट दिला होता परतू मनपाचे सदर विषयाचे गांभीर्य न घेतल्याने दि.१९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विराटनगर हिंदू स्मशानभूमीतून मनपा मुख्यालयापर्यंत प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्यात येणार आहे .

