गुहागर [उदय दणदणे] : गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठची सर्वसाधारण ग्रामसभा गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी श्री नवलाई देवीची सहाण येथे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्राम सभेमध्ये एक अनोखा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे.
गावातील शाळा व काॅलेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा म्हणून वाडी-वाडीत घंटा वाजली की संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत दोन तास टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद ठेऊन पालकांनी मुलांसोबत बसून अभ्यास करून घ्यावा” असा ठराव मांडण्यात आला आहे, यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास तर होईलच, त्याच बरोबर पालक व मुले यांचे सद्या दुरावत चाललेले नाते पुन्हा जिव्हाळ्याचे होण्यास मदत होईल, मुलांचे आणि पालकांचे प्रेम व आपुलकी अधिक घट्ट होईल, असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी समजावून सांगितल्यावर एक व्यापक दृष्टिकोन लक्षात घेऊन चर्चेअंती हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदर ठरावाची अमलबजावणी सुद्धा तत्काल करण्यात यावी असेही ठरले.
सदर ग्रामसभेला उपसरपंच सुरज घाडे, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, बचत गटाच्या सीआरपी श्रृती कदम, गावातील वाडी प्रमुख, जेष्ठ ग्रामस्थ शशिकांत पवार, नामदेव पवार, उदय पवार, प्रकाश पवार, शांताराम गोरिवले, भिकू मालप, शांताराम गावणंग, काशिराम गावणंग, उदय गावणंग, नारायण गावणंग, महेश गोरिवले, यशवंत आंबेकर, रामचंद्र आंबेकर, वसंत गावणंग इत्यादी प्रमुख मंडळींसह बहुसंख्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. सदर ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

