गुहागर : गुहागर तालुक्यात दत्तजयंती उत्सव हा गावोगावी मोठ्या उस्ताहात विविध कार्यक्रमांसोबत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो. अशातच एका तालुक्य बाहेरील भजनीबुवाने गुहागर तालुक्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी भजनाचा कार्यक्रम ठरून वाढीव पैशाच्या लालसेपोटी श्री. दत्त मंदिर नरवण या मंडळाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांनी हरिनामाला पैशामध्ये तोलुन वाढीव पैशाच्या लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी घालण्याचा निर्णय गुहागर मध्ये सर्वत्र जाहीर केला आहे.
दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी श्री दत्त जयंती उत्सवा प्रित्यर्थ गुहागर मधील श्री दत्त मंदिर नरवण येथे श्री. विनोद चव्हाण बुवा, दहिसर विरुध्द श्री. संदिप पुजारी बुवा देवगड यांचा डबलबारी भजनाचा कार्यक्रम ठरलेला असताना त्याच तारखेला (दि. ०६ डिसेंबर २०२५) रोजी श्री. विनोद चव्हाण बुवा यांनी गुहागर तालुक्यातील नरवण शेजारील वेळणेश्वर या गावी श्री. संदिप लोके बुवा देवगड यांचे विरुध्द कार्यक्रम ठरवून अगोदर ठरविलेल्या श्री दत्त मंदिर नरवण या मंडळाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
श्री दत्त देवस्थान वेळणेश्वर यांनी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेप्रमाणे दि. ०६ डिसेंबर २०२५ रोजी श्री. विनोद चव्हाण यांनी वेळणेश्वर येथे कार्यक्रम घेऊन श्री दत्त मंदिर नरवण येथे आपल्या मंडळाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. तरी श्री दत्त मंदिर नरवण या मंडळातील सदस्यांनी संतप्त होऊन एकाच दिवशी दोन ठिकाणी श्री. विनोद बुवा कसा कार्यक्रम करु शकतात असा जाब विचारल्या नंतर श्री. विनोद बुवा यांनी उडवा उडविची उत्तरे दिली. श्री दत्त मंदिर नरवण या मंडळाचा कार्यक्रम नियोजित झालेला असताना अचानक कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचे काम श्री. विनोद बुवा चव्हाण यांनी जाणून बुजून केले. कदाचित ते त्यांनी अतिरिक्त पैश्याच्या लालसेपोटी केले असावे. त्यामुळे गुहागर तालुक्यामध्ये श्री. विनोद चव्हाण बुवा, दहिसर यांच्या विरुध्द संतप्त वातावरण निर्माण झालेले आहे. संबंधीत मंडळातील सदस्यांनी भजन परंपरेतील प्रतिष्ठीत व्यक्तींना संपर्क करून घडलेला प्रकार फोन द्वारे सांगीतला.
त्यानुसार अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर यांनी निर्णय घेत, हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी अक्षम्य फसवणूक करणा-या श्री. विनोद बुवा चव्हाण, दहिसर यांना यापुढे गुहागरमध्ये सिंगल बारी अथवा डबलबारी भजन करण्यास आजीवन बंदी घालण्यात आली. त्याचप्रमाणे भजनामध्ये मद्यपान करणे, गैरवर्तन करणे असे प्रकार करणारे भजनी कलाकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका भजन परंपरेला कोणतेही गालबोट लागू देणार नाही तर अशा हिंसक प्रवृत्तीला ठेचण्याचे कार्य करत राहिल. भजन कलेचे संवर्धन आणि संघटन करत राहिल असा निर्णय सर्वानुमते घेतला.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

