गुहागर : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा दि. ४ जानेवारी २०२६ रोजी गुहागर तालुक्यातील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हा अध्यक्ष श्री. आनंद शेलार, केंद्रीय कार्यवाह श्री. माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद युवा परिषद दक्षिण विभाग अध्यक्ष श्री अरुण मौर्य, केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष श्री आबा पाटील, प्रसिद्ध साहित्यिक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. बाळासाहेब लबडे यांच्यासह चिपळूण शाखेचे दहा वर्ष नी आता विद्यमान अध्यक्ष अरुण इंगवले, जिल्हा कार्यकारणी सदस्य राष्ट्रपाल सावंत असे अनेक मान्यवर पदाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाखांचे तालुकास्तरीय शाखा अध्यक्ष, प्रतिनिधी व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाला. या प्रसंगी श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बोलभट उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री. आनंद शेलार यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून ते सर्वानुमते कायम करण्यात आले. सभेपुढील विषयांच्या पूर्ततेची चर्चा करण्यात आली. सभेपुढील पुढील विषयांमध्ये नवीन वर्षात राबविणार्या उपक्रमांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद व प्रत्येक तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तीन साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत त्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले. सभासद संख्या वाढविण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांवरही सविस्तर चर्चा झाली. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी उपस्थित झालेल्या विषयांमध्ये श्री युयुत्सु आर्ते आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांनी को.म.सा.प. विकासाच्या दृष्टिकोनातून विचार मांडले. लांजा शाखाध्यक्ष श्री जाधव यांनी शाखा विकासावर कसा भर दिला पाहिजे याविषयी आपले प्रश्न मांडले.
समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. प्रदीप ढवळ यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ मिळावे यासाठी परिषदेतर्फे प्रकाशन संस्था सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच कार्यशाळा, चर्चासत्रे, साहित्य संमेलने यांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या विविध मराठी भाषा विषयक उपक्रमांमध्ये परिषद सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. ईश्वर हलगरे यांनी केले. या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गुहागरचे उपाध्यक्ष मोहन पाटील, सचिव ईश्वर हलगरे, सहसचिव डॉ. बाळासाहेब लबडे, सदस्य रजत बेलवलकर व आजीव सभासद योगेश होळंब आदी उपस्थित होते.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

