Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
  • डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
  • कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
  • हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
  • उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
गुहागर

कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 11, 2026Updated:February 11, 2026No Comments3 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

▪️पत्रकार/सामाजिक कार्यकर्ता : उदय गणपत दणदणे [पालशेत-निवोशी] : गुहागर तालुक्यातील वाकी गावचे सुपुत्र, नमन लोककला संस्था तालुका शाखा  सदस्य,उत्तम नमन – नाट्य कलाकार अमित काताळे यांचा आज ११ फेब्रुवारी रोजी वाढदिवस….! नेहमीच प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेल्या गुहागरच्या ह्या रत्नाचा कला क्षेत्रातील प्रवास दखलनीय थक्क करणारा आहे.

गुहागर मध्ये वाडी वस्तीवर जोपासली जाणारी कोकणातील भोवणीचे खेळे हि कला त्यांनी चुलते कै.धाकू रामचंद्र काताळे यांच्याकडून आत्मसात करून त्यात आवड निर्माण केली त्यानंतर ५-६ खेळ्यावर आलेली वाडीची खेळे परंपरा पुन्हा जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करून पुर्वी प्रमाणे वाडीतील ४०-५० भोवनी खेळे गुहागर तालुक्यातील गावो गावी भोवणी कला सादर करू लागले.

नमन, कलगी तुरा लोककला संस्कृतीतून घडलेला कलाकार पुढे नाट्य क्षेत्रातील दिगज व्यक्तीबरोबर काम करत, आपल्या अंगी असलेली कला अधिक विकसित होण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले, त्यांचा नाट्यक्षेत्रातील प्रवास २००४ मध्ये सुरु झाले, २००९ मध्ये “सारे प्रवासी मालवणचे” या व्यावसायिक नाटकातून अभिनयाला सुरुवात झाली. २०१२ मध्ये “खेळ आयुष्याच्या पठावरचा” या नाटकात ही अभिनय केला,त्याच बरोबर  २०१३ मध्ये “आमची देवाक काळजी” या नाटकाची प्रकाश योजना आणि “संगीत”धुरा सांभाळली.

*श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे कोकणातील लोककलांचा पहिला प्रयोग १७ जानेवारी २०१८ रोजी सादरीकरण करणारे एकमेव कलामंच श्री साई गणेश कोकण कलामंच मुंबई, गुहागर. संस्थापक : अमित शांताराम काताळे होय.*

कोकणातील लोककला श्री शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह, दादर येथे पहिल्यांदाच सादरीकरण करताना सुरुवातीला नाट्यगृहातून नकार दिला गेला कारण दिले गेले पुर्वी अंदाजे – ३०-३५ वर्षे आधी या कलेचा प्रयोग सादर सुरू असताना नाट्यगृहात काहि भानगडी झाल्या होत्या असे सांगण्यात आले आणि म्हणूनच तारीख मिळणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर सर्व कार्यक्रम सुरळीतपणे होईल असे आश्वासन आणि जबाबदारी कताळे यांनी स्वतः स्विकारतो असे सांगितल्यावर श्री हरी पाटणकर यांनी स्वतःच्या नावावर बुक झालेली तारीख देऊन मोलाचे सहकार्य केले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नाट्यक्षेत्रातील कलाकार आणि ते स्वतः गुन्हे शाखेचे प्रशिक्षण घेतलेले पत्रकार असल्याने लाईव्ह प्रक्षेपण साठी IBN लोकमत, टिव्ही 9 आणि प्रहार, पुढारी, नवाकाळ चे पत्रकार यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. आज नमन -कलगी तुऱ्याचे प्रयोग याच श्री शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह, दादर ठिकाणी होताना खऱ्या अर्थाने याचे श्रेय अमित काताळे यांना जाते.

श्री साई गणेश कोकण कलामंच, मुंबई, गुहागर हा कोरोना काळापासून त्यांनी थांबवीला होता, पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असताना कोणत्याही कार्यक्रमात खंबीरपणे पाठीशी असणारे आई-वडील यांनी अचानकपणे साथ सोडली. १६ ऑगस्ट २०२३ रोजी वडील कै. शांताराम रामचंद्र काताळे आणि ३० एप्रिल २०२५ रोजी आई कै.शोभा शांताराम काताळे यांनी साथ सोडल्याने ते त्यांचं स्वप्न अधुरं राहिले. पण ते दुःख मनाशी बाळगून तिथेच न थांबता त्यांनी सध्याचा गंभीर विषय म्हणजे मुलांची वाढती वयं आणि लग्न न होण्याची कारणं लक्षात घेऊन त्यावर ज्वलंत प्रकाश टाकणारे परंतु तुफान विनोदी मध्ये लिहलेले लग्नाची वरात आली राजाच्या दारात हे वगनाट्य त्यांनी वाजविले तीच कथा, संकल्पना घेऊन गाव गोंधळ या नाटकाची निर्मिती २०२५ मध्ये झाली, आता रंगमंच्यावर आलेला “गाव गोंधळ” या नाटकात ते प्रमुख भूमिका बजावत असुन आतापर्यंत या नाटकाचे ११ प्रयोगाचा टप्पा पार झाला आहे, आता १२ वा, प्रयोग २२ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड येथे होणार आहे.

  अशा ह्या हरहुन्नरी कलाकाराला आजच्या वाढदिवसा निमित्त लक्ष लक्ष हार्दीक शुभेच्छा..!

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article“देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
Next Article त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय

February 11, 2026
खेड

“देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!

February 6, 2026
गुहागर

गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

January 26, 2026
Top Posts

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025248 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025224 Views

कविता : वायरमन..!

January 13, 2025165 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.