Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
  • कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
  • “देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!
  • गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
  • डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
  • कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
  • हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
  • उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय
गुहागर

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ जय बजरंगी पालशेत संघाचा शानदार विजय

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 11, 2026No Comments2 Mins Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

पत्रकार – मेघना सुर्वे : त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त स्वयंम् दीप विचार मंच तथा स्वयंम् दीप क्रिकेट संघ, पालपेणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर चषक २०२६’ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच धम्म दीप बुद्ध विहार, पालपेणे बौद्धवाडी येथे जय बजरंगी पालशेत व गुलजार गुहागर या संघांमध्ये पार पडला. या अंतिम सामन्यात जय बजरंगी पालशेत संघाने प्रथम फलंदाजी करत ३३ धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. उद्दिष्टाचा पाठलाग करताना गुलजार गुहागर संघाला जय बजरंगी पालशेत संघाने अवघ्या २१ धावांवर रोखले आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा मान मिळवला.

आयोजकांकडून संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. यावेळी पालपेणे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर आणि प्रविण संसारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या  दोन दिवसीय स्पर्धेसाठी पेवे गावचे बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक १३ मुंबई सचिव गितेश कदम आणि गुहागरचे निहाज यांनी आपल्या सुमधुर आवाजात समालोचन करत सामना प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला.

संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून दिलीप गमरे, प्रज्ञेश कांबळे, सुशांत सावंत, विशाल गमरे, रुपेश काताळकर व ऋतिक गमरे यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणून इलेव्हन स्टार क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू, निगुंडल गावचा सुपुत्र फैझान कापडी यांनी १५,००० रुपये रोख पारितोषिक दिले, तर द्वितीय पारितोषिक म्हणून १०,००० रुपये रोख रक्कम सुजित कदम (पेवे) यांच्याकडून विशेष देणगी स्वरूपात मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी उमेश गमरे, यांचे मूल्यवान सहकार्य व स्वयंम् दीप विचार मंचचे सर्व सदस्य, बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २२ तसेच माता रमाई महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Articleकोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

कोकणच्या लोककलांना व्यासपीठ निर्माण करून देणारा अवलिया अमित काताळे यांस वाढदिवस अभिष्टचिंतन..!

February 11, 2026
खेड

“देवखेळ” नावाचा “पोरखेळ” तातडीने बंद करा !!

February 6, 2026
गुहागर

गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ

January 26, 2026
Top Posts

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) नेत्याच्या मुलाने भरधाव कारने वृद्धाला चिरडले; वृद्धाचा जागीच मृत्यू

August 5, 2025248 Views

पालशेत येथील भायनाक कुटुंब अंधारात

August 5, 2025224 Views

कविता : वायरमन..!

January 13, 2025165 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2026 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.